मुंबई : ज्येष्ठ कवी नलेश पाटील यांचं दीर्घ आजारानं निधन झालं आहे. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नलेश पाटील 62 वर्षांचे होते.

 
टूरटूर, हमाल दे धमाल' यासारख्या चित्रपटांसाठी नलेश पाटील यांनी गीतलेखनही केलं होतं. 'कवितांच्या गावा जावे' हा नलेश पाटील, अशोक नायगावकर, अशोक बागवे, अरुण म्हात्रे, महेश केळुस्कर, सौमित्र ह्या सर्व कवींचा एकत्रित उपक्रम डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केला होता.

 
नलेश पाटील यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट या संस्थेत झालं होतं. ते एका अमेरिकन कंपनीत क्रिएटिव्ह डायरेक्टर होते. नलेश पाटील यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाला मोठा हादरा बसल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.