सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप गावात मळसिद्ध महाराजांच्या यात्रेवेळी शोभेच्या दारुकामामुळे झालेल्या स्फोटात तब्बल 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही समजतं आहे.
दरवर्षी मकरसंक्रांतीला मळसिध्द महाराजांची यात्रा भरते. याच यात्रेच्या शेवटच्या दिवशी शोभेचं दारुकाम केलं जातं. यंदाही मोठ्या प्रमाणात शोभेचं दारुकाम करण्यात आलं होतं. याचवेळी आकाशात उडालेले काही आगीचे गोळे दारुकामाच्या साठ्यावर पडल्यानं मोठा स्फोट झाला. त्यातच अनेक जण जखमी झाले.
दरम्यान, जखमींना सोलापूरला हलवण्याचं काम सध्या सुरु आहे. तसंच घटनास्थळी सोलापूर ग्रामीण पोलिसांचं पथकही दाखल झालं.
सोलापूर जिल्ह्यात शोभेच्या दारुकामाचा स्फोट, 20 जण जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Jan 2018 12:09 AM (IST)
सोलापूर जिल्ह्यातील मंद्रुप गावात मळसिद्ध महाराजांच्या यात्रेवेळी शोभेच्या दारुकामामुळे झालेल्या स्फोटात तब्बल 20 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -