मुंबई : ईडीने अनिल देशमुख प्रकरणात आत्तापर्यंतची केलेल्या चौकशीचा तपशील एबीपी माझाच्या हाती आला आहे. कोलकातामधील बोगस कंपनीपासून ते बार मालकांकडून हप्ता वसुलीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या दोन केंद्रीय तपास यंत्राणा काय काय हाती लागलं याची पूर्ण माहिती माझाच्या हाती आहे


ईडी आणि सीबीआयच्या सूत्रांनुसार नागपूर मधील एका मोठ्या सीएच्या मदतीने कोलकाता येथे बोगस कंपनीमध्ये दोन ॲापरेटर मनोहर नांगलिया आणि बाबूलाल बांका यांच्यामार्फत पैशांची उलाढाल केली. या दोन्ही शेल कंपन्यांचा वापर काळ्या पैशांना लिगल करण्यासाठी केला जात होता. या कंपनीच्या माध्यमातून पैसा Zodiac डेलकॉममध्ये ट्रान्स्फर केले जात होते. ही कंपनी अनिल देशमुख यांच्या मुलाच्या मालकीची असल्याचे तपास यंत्राणांकडून सांगितलं जात आहे. या कंरनीमध्ये मागील दोन वर्षात कोट्यावधीची गुंतवणूक झाल्याचे कळत आहे. याच पैशांच्या वापर महाराष्ट्रातील 10 कोटींचा गोदाम खरेदी करण्यासाठी केला जात असल्याची सूत्रांनी माहिती आहे. तशी या कंपन्यांच्या balanced sheet मध्ये ही नोंद असल्याच सांगितले जात आहे. 


तसच बंगळुरू येथील एक मोठ्या रिअल इस्टेट कंपनीमध्ये  अनिल देशमुख यांच्यामार्फत पैशांच्या गुंतवणूक झाल्याची माहिती ईडी अधिकाऱ्यांना प्राप्त झाली, त्याचीही चौकशी सुरू आहे, असे सांगितलं जात आहे.  या कंपनीत मोठा पैसा ट्रान्सफर  केला गेला आहे आणि त्या पैशांनी रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांच्या नावावर शेअर घेतले गेले आहेत. ही कंपनी 2018 मध्ये कर्नाटकच्या मंत्र्याच्या संदर्भात आयटीच्या रडारवर आली होती. या कंपनीच्या माध्यामातून परदेशात मोठी रक्कम पाठवल्याचं ही कळत आहे. 


त्याच बरोबर ईडीने मुंबईतील एकूण 10 बार मालकांचे जबाब नोंदवले होते.  त्या पैकी 4 जणांनी कबूली दिली की त्यांनी मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरात बार मालकांकडून हफ्ता घेऊन सचिन वाझेला दिला आणि इतर 6 बार मालकांनी यांना हफ्ता दिल्याची कबूली दिली. हे पैसे सचिन वाझे, सुनिल माने आणि इतर दोन पोलीस अधिकारी घेत असल्याचे ईडीकडे पुरावे आहेत. तर ईडीला माहिती आहे की वाझेने पैसे अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायक पलांडे आणि कु्ंदनला दिले. यासाठीच दोघांची चौकशी केली जात आहे