बुलढाणा : अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेसाठी अॅलोपॅथी पदवीधारक डॉक्टरांऐवजी निवासी डॉक्टर म्हणून आयुष डॉक्टरांच्या नेमणुका करणाऱ्या रुग्णालयावर आता कारवाईचा बडगा उगारण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं चित्र आहे. अशा नेमणुका करणाऱ्या हॉस्पिटल्सची मान्यता रद्द करण्याचा इशारा रुग्णालयाना मान्यता देणाऱ्या "नॅशनल एक्रीडेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अॅन्ड हेल्थ केअर " अर्थात N.A.B.H. ने दिला आहे. अर्थात असा नियम हा राज्यवार वेगवेगळा असू शकतो. मात्र NABH च्या अशा नोटिसेमुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.


अॅलोपॅथी उपचार देणाऱ्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात आयुष डॉक्टरांच्या नियुक्त्या केल्या जात असल्याचं निदर्शनात आले. ही कृती नियम आणि अटी याचं उल्लंघन करणारी आहे. त्याचा संबंध थेट रुग्णहित व आरोग्याशी आहे. त्यामुळे अशा नेमणुका करणाऱ्या रुगणालयांची मान्यता रद्द " करण्याच्या नोटिसेस NABH या रुग्णालया ला मान्यता देणाऱ्या केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थेने काढल्या आहेत. यामुळे मात्र अशा रुग्णालयाची मान्यता रद्द झाल्यास रुग्ण सेवेवर त्याचा परिणाम बघायाला मिळणार आहे.


राज्यात जवळपास 25 हजार रुग्णालय आहेत. 12 हजार अतिदक्षता विभाग आहेत.अशा अतिदक्षता विभागात हजारों आयुष डॉक्टर्स सेवा देत आहेत. अॅलोपॅथी डॉक्टरांची कमतरता असल्याने असे हॉस्पिटल आपल्या ICU मध्ये कमी पगारात आयुष डॉक्टरांची नेमणूक करतात. आयुर्वेदिक , होमियोपैथी डॉक्टर्स अतिदक्षता विभाग अनेक वर्षापासून सांभळत आहेत.त्यामुळे NABH ने आताच अशा नोटिस पाठविण्याचे नेमक कारण काय ? यावर प्रश्नचिन्ह आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांना दिलेल्या शस्त्रक्रिया करण्याच्या परवानगीमुळे अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या इगोला इजा झाल्याचं ही बोलेल जात आहे. त्यामुळे आयुष डॉक्टरांचा दर्जा कमी आहे हे दाखविण्याचा हा प्रयत्न आहे का..?शिवाय आयुष डॉक्टरांची सेवा घेण्याचं बंद केलं तर अॅलोपॅथी डॉक्टरांची संख्या सेवा पुरविण्या इतकी आहे का..? हा प्रश्न ही उभा राहत आहे.




परदेशात डॉक्टर्स कमी असल्याने परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन डॉक्टरांच्या बरोबरिने रुग्णसेवेत समावून घेण्याचे प्रयोग होत आहेत. मात्र भारतात अॅलोपॅथी डॉक्टरांच्या समकक्ष असलेल्या साडे पाच वर्षाच्या अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आयुष डॉक्टरांबाबत असा दूजा भाव का? असा प्रश्न आयुष डॉक्टर्स विचारत आहे.


नुकतच केंद्र सरकारने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने दिलेल्या सूचनांनुसार आयुर्वेदिक डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मॉडर्न मेडिसिन अर्थात अॅलोपेथी डॉक्टरांच हे आयुष डॉक्टरांना डीवचण्याचा प्रयत्न तर नाही ना...? असा सवाल या NABH च्या आदेशामुळे आयुष डॉक्टरांच्या मनात उभा राहत आहे.