जळगाव : जळगावात समाज कल्याण विभागाच्या (Social Welfare Department) परीक्षेला (Exam) अवघे दोन ते पाच मिनिटे उशीर झाल्याने दोन ते पाच परीक्षार्थी उमेदवारांना प्रवेश नाकारला आहे. त्यामुळं या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. समाज कल्याण विभागाचा गृहपाल पदासाठी आज लेखी परीक्षा होती. जळगावातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे.
महिला लहान मुलासोबत परीक्षा केंद्रावर पोहोचली पण...
परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी परीक्षार्थींना अवघे दोन ते पाच मिनिटं उशीर झाला. त्यानंतर परीक्षा केंद्रात जाऊ न दिल्याचे सांगत उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. परीक्षेला जाऊ न दिल्यानं परीक्षेची संधी चुकल्यानं, महिला परीक्षार्थी उमेदवारांना अश्रू अनावर झाले. पाचोरा, संभाजीनगर असे वेगवेगळ्या तालुक्यात तसेच इतर जिल्ह्यांमधून उमेदवार परीक्षा देण्यासाठी जळगावमध्ये आले होते. संभाजीनगरची महिला चक्क आपल्या लहान मुलासोबत परीक्षा केंद्रावर पोहोचली. मात्र अवघे पाच मिनिट उशीर झाल्यामुळे तिला परीक्षेला जाऊ दिले नाही.
उमेदवारांनी अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण कोणाही प्रतिसाद दिला नाही
दरम्यान गेट बंद झाल्यावर संबंधित परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी अधिकाऱ्यांशी कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, कोणीही समोर आले नसल्याचे उमेदवारांनी सांगितले. दोन ते पाच मिनिटं उशीर झाल्यामुळं उमेदवार परीक्षेला मुकले आहेत. आमची परीक्षेची संधी हुकली, आमच्या आयुष्याचं नुकसान होत असल्याचे सांगत परीक्षार्थी महिला उमेदवाराने बोलताना व्यक्त करत संबंधित प्रकारावर नाराजी व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या: