मुंबई : इंजिनिअरिंग सीईटी परीक्षेचा निकाल 15 सप्टेंबरला जाहीर झाल्यानंतर आता प्रवेशासाठी वेळापत्रक सीईटी सेलच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलं आहे. आजपासून सीईटी परीक्षेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत आहे. इंजिनिअरिंगचा प्रथम वर्ष हे दिवाळीनंतर 1 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक ऑनलाईन अर्ज भरायचा असून मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे.
कसे असेल इंजीनियरिंग प्रवेशाचे वेळापत्रक आणि प्रक्रिया?
- 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर - विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
- त्यासोबतच विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फॉर्म कन्फर्मेशन या दरम्यान करायचा आहे.
- 7 ऑक्टोबर - इंजिनिअरिंग प्रवेशासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
- 8 ते 10 ऑक्टोबर - सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यात सुधारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ दिला आहे.
- 12 ऑक्टोबर - इंजिनिअरिंग प्रवेशाची अंतिम यादी जाहीर होईल.
पहिल्या कॅप राउंडला सुरवात
-13 ते 15 ऑक्टोबर - इंजिनिअरिंग प्रवेशाच्या पहिल्या कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्या ऑप्शन फॉर्म भरून निश्चित करायचा आहे.
-18 ऑक्टोबर - कॅंप राउंड 1 पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
- 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजेपर्यत-इंजिनियरिंग प्रवेशाच्या कॅप राऊंड 1 मध्ये मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे त्यासोबतच फी भरून मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे अन्यथा दुसऱ्या राउंडसाठी विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा करायची आहे.
- 22 ऑक्टोबर - पहिला कॅप राऊंडनंतर उरलेल्या जागांचा तपशील संकेतस्थळावर जारी केला जाईल.
दुसऱ्या कॅप राउंडला सुरवात
- 23 ते 26 ऑक्टोबर - इंजिनिअरिंग प्रवेशाच्या दुसऱ्या कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्या ऑप्शन फॉर्म भरून निश्चित करायचा आहे.
- 28 ऑक्टोबर - इंजिनिअरिंग प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
- 29 ते 31 ऑक्टोबर दुपारी 5 वाजेपर्यत-इंजीनियरिंग प्रवेशाच्या कॅप राऊंड 2 मध्ये मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे त्यासोबतच फी भरून मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे अन्यथा तिसऱ्या राउंड साठी विद्यार्थ्यांनी प्रतीक्षा करायची आहे
तिसऱ्या कॅप राउंडला सुरवात
- 1 नोव्हेंबर - कॅप राऊंड दोन नंतर उरलेल्या जागांचा तपशील जाहीर केला जाईल.
- 2 ते 4 नोव्हेंबर - इंजिनिअरिंग प्रवेशाच्या तिसऱ्या कॅप राऊंडसाठी विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म भरून निश्चित करायचा आहे.
- 6 नोव्हेंबर -इंजिनिअरिंग प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल.
- 7 ते 9 नोव्हेंबर दुपारी 5 वाजेपर्यत -इंजीनियरिंग प्रवेशाच्या कॅप राऊंड 2 मध्ये मिळालेले कॉलेज निश्चित करायचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे त्यासोबतच फी भरून मिळालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करायचा आहे.