मुंबई : ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव नाही. एबीपी माझाच्या बातमीनंतर दोन तासात ऊर्जा विभागाकडून नवी यादी जाहीर केली आहे. राज्यातल्या नेत्यांच्या लाखो रुपयांची वीजबिले थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
शेतक-यांच्या विज बिलावरुवन गळा काढणाऱ्या लोक प्रतिनिधीनींची लाखो रुपयांची थकबाकी ऊर्जा विभाग कशी वसूल करणार हा सवाल उपस्थित होत आहे. 30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील अतिमहत्वाच्या आमदार-खासदार आणि मंत्री असे 372 ग्राहकांची एक कोटी 27 लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
कोणाची किती थकबाकी?
- आरोग्यमंत्री राजेश टोपे याची चार लाख रुपये थकबाकी
- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 10 हजार रुपये थकबाकी
- कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 2 लाख 63 हजार रुपये थकबाकी
- राज्यमंत्री विश्वजित कदम यांची 20 हजार रुपयांची वीज बिल थकीत आहे
- श्रीमंत युवराज संभाजीराजे 1 लाख 25 हजार 934
- माजी मंत्री सुभाष देशमुख यांची तीन वीज कनेक्शन आहेत मिळून 60 हजार रुपये थकबाकी आहे
- भाजप आमदार जयकुमार गोरे सात लाख रुपये थकबाकी
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 2 लाख 25 हजार थकीत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे 70 हजार रूपये थकबाकी
- आमदार समाधान आवताडे एकूण वीस हजार थकबाकी
- आमदार राजेंद्र राऊत बार्शी 3 लाख 53 हजार रूपये थकबाकी
- आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 विज जोडणीतील तब्बल 7 लाख 86 हजार रुपयांची थकीत
- खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची चार विज जोडणीतील तीन लाख रुपये
- आमदार संग्राम थोपटे यांची चार विज जोडणीतील 1 लाख रुपये थकीत
- माजी खासदार प्रतापराव जाधव दिड लाख रुपये थकीत
- शिवसेना आमदार सुहास कांदे 50 हजार रुपये थकीत
- आमदार रवी राणा 40 हजार रुपये थकीत
- आमदार वैभव नाईक यांच्या औद्योगीक विज जोडणीची 2 लाख 80 हजार थकबाकी
- माजी मंत्री विजयकुमार गावित 42 हजार थकबाकी
- माजी आमदार शिरीष चौधरी 70 हजार थकबाकी
- मंत्री संदीपान भुमरे 1 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी
- खासदार रजनीताई पाटील यांची 3 लाख रुपये थकबाकी
- आमदार प्रकाश सोळंके 80 हजार रुपये थकबाकी
- आमदार संदीप क्षीरसागर 2 लाख 30 हजार रुपयांची थकबाकी
- राज्यमंत्री संजय बनसोडे 50 हजार रुपयांची थकबाकी
- आमदार अशिष जयस्वाल 3 लाख 36 हजार रुपये थकीत
- आमदार महेश शिंदे 70 हजार रुपये
- माजी मंत्री सुरेश खाडे यांचे कुटुंबीय याची 1 लाख 32 हजार थकबाकी
- सुमन सदाशिव खोत 1 लाख 32 हजार 435