Vidrohi Marathi Sahitya Sammelan : गेल्या दोन दिवसांपासून उदगीर येथे सुरू असलेल्या 16 व्या विद्रोही साहित्य संमेलनाची आज सांगता झाली. दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या उपस्थिती आज या दोन दिवसांच्या साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा पार पडला. 


यावेळी नागराज मुंजुळे यांनी साहित्यिक, कलाकार आणि सर्वसामन्यांतील दरी कमी झाली पाहिजे असे मत मांडले. ते म्हणाले, या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अंजुम कादरी आहेत. कादरी या मुस्लिम असून त्यांना भाषेची अडचण असताना ही त्या मराठीत बोलत आहेत. काही समाजात बायको नवऱ्याच्या पुढे गेली तर पती बायकोला मारतो हे वाईट आहे. परंतु, येथे मात्र चित्र वेगळे आहे. संमेलनाच्या अध्यक्ष या डॉ. अंजुम कादरी आहेत.  तर त्यांचे पती अहमद कादरी हे संमेलनाला आलेल्या पाहुण्यांची सरबराई करत आहेत. या पती पत्नीच्या नात्यात तसे नाही हे कौतूक आहे. 


"जागर करणारे साहित्यिक म्हणजे विद्रोही साहित्यिक आहेत. जगण्याचा विचार न करता काही थोर विचार करत बसने कामाचे नाही तर उजेड देणारा ब्लब झाले तर कामाचे आहे. भाडणे झाली तर शांत बसतो तो खरा विद्रोह आहे. अलिकडच्या काळात माणूस हा मोबाइल झाला आहे. मोबाइलच्या माध्यमातून समाजात विष कालवले जात आहे. अलिकडे अनेक दिवस साजरे केले जातात. त्याचप्रमाणे पुस्तक डे देखील साजरा केला जातो. परंतु, पुस्तक डे रोजच असायला हवा, असे मत नागराज मंजुळे यांनी यावेळी व्यक्त केले. 


दरम्यान, या साहित्य संमेलनात सात ठराव वाचण्यात आले.  यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सरकारी अनुदान बंद करावे, उदगीर जिल्हा झाला पाहिजे, मुक्रमाबादला तालुका घोषित करावा, महात्मा बसवेश्वर अध्यासन मंजूर करावे या ठरावांचा समावेश आहे.  


सांस्कृतिक बहुविधतेचा सन्मान, बहुभाषिकांचा आदर, संविधानाचे समर्थन आणि सनातनवादाला विरोध या चतुःसुत्रीवर हे सोळावं विद्रोही साहित्य संमेलन उभे होतो. यादृष्टीने कोकणी-मराठी वादाऐवजी दोन्हींसह दखनी, उर्दू, कन्नड इत्यादी भाषिक लेखक, रसिकांना विद्रोहीनं सन्मानानं आमंत्रित करण्यात आलं होतं. म. फुले रचित सत्याचा अभंग, कबीराचा दोहा आणि आंबेडकरी शाहीर वामनदादांचे मानवगीत आणि आदिवासी लोककलावंत अमृत भिल्ल यांच्या पावरी वादनानं विद्रोही मराठीचा सोहळ्याची  काल सुरूवात झाली होती. तर आज सांगता झाली.