मुंबई :  एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि मनसुख हिरेन खून प्रकरणात (Mansukh Hiren murder case) अटक करण्यात आलेले प्रदीप शर्मा यांची प्रकृती खालावली आहे. प्रदीप शर्मा यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेलमध्ये त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


प्रदीप शर्मा यांच्या पोटात गेल्या 12-15 दिवसांपूर्वी पोटात दुखत असल्यामुळे त्यांना ससून हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सोनोग्राफी करण्यासाठी आणि पुढील उपचारासाठी शर्मा हे सध्या ससूनमध्ये आहेत. अँन्टिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेले प्रदीप शर्मा सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एन्काऊटंर स्पेशलिस्ट अशी प्रदीप शर्माची ओळख आहे. मुंबई पोलिस दलातील कार्यरत असताना त्यांच्यावर आत्तापर्यंत 113  एन्काऊटंरची नोंद आहे. प्रदीप शर्मा यांनी शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मधून 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता


काय आहे प्रकरण? 


मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ कार प्रकरणाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. कारण यानंतर अनेक नाट्यमय घटना घडत गेल्या होत्या. याच काळात मनसुख हिरण यांची हत्या झाली होती. मनसुख हिरण याचा मृतदेह 5 मार्चला मुंब्र्याजवळील खाडीत सापडला होता. ज्यानंतर मनसुख हिरण याची हत्या सचिन वाझेंनीच केल्याचा आरोप त्याच्या कुटुबियांकडून करण्यात आला होता. तपास एटीएस कडून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे देण्यात आला. या प्रकरणात मुख्य आरोपी सचिन वाझे, प्रदीप शर्मासह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.


कोण आहेत प्रदीप शर्मा?



  •  प्रदीप शर्मा 1983 साली पोलीस सेवेत रुजू झाले

  • पोलीस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख

  •  312 गुंडांचा प्रदीप शर्मा यांच्याकडून एन्काऊंट

  •  कुख्यात गुंडांशी त्यांचा संबंध असल्याचाही आरोप

  • 2008 मध्ये पोलीस दलातून निलंबन

  •  2017 मध्ये आरोपांतून क्लीनचिट

  •  2017 साली त्यांनी दाऊदच्या भावाला अटक केली

  • 2019 मध्ये पोलीस सेवेचा राजीनामा

  •  नालासोपाऱ्यात शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली