मुंबई : राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये अनाथ मुलांसाठी शासकीय नोकरी शैक्षणिक क्षेत्रात 1 टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयासह एकूण अकरा निर्णय घेण्यात आले आहेत.


मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त) - 17 जानेवारी 2018

1. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप पॉलिसी-2017 ला मान्यता.

2. मराठवाड्यातील वॉटर ग्रीडसाठी मेकोरोट या इस्त्राईल सरकारच्या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यास मान्यता.

3. अनाथ मुलांच्या सामाजिक-आर्थिक उन्नतीसाठी 1 टक्के समांतर आरक्षण ठेवण्याचा निर्णय.

4. कोल्हापूर विमानतळाचे नामकरण ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ, कोल्हापूर’ करण्याचा निर्णय.

5. ग्रामपंचायतींच्या स्वत:च्या कार्यालयासाठी मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरु करण्यास मान्यता.

6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (मिहान) चे उन्नतीकरण, आधुनिकीकरण, देखभाल-संचलन आदी कामे पीपीपी तसेच डीबीएफओटी तत्त्वावर करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यास मान्यता.

7. सरपंचांच्या थेट निवडणुकीसंदर्भात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम-1958 च्या काही कलमांमध्ये सुधारणा.

8. सिडको महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व विकास प्रकल्पांसाठी साडे बावीस टक्के विकसित भूखंडाची योजना मंजूर.

9. भूसंपादन अधिनियम-2013 मध्ये सुधारणा.

10. महामंडळाच्या सदस्य संख्या वाढीसाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियम-2000 मध्ये सुधारणा.

11. नागरी जमीन कमाल धारणा कलमानुसार औद्योगिक प्रयोजनासाठी सवलत देण्यात आलेल्या जमिनीच्या हस्तांतर शुल्काच्या आकारणीबाबत निर्णय.

संबंधित बातम्या :

ग्रामीण भागातील जमिनींसाठी चार पट मोबदला मिळणार!

सिडको प्रकल्पग्रस्तांना 22.5 टक्के विकसित भूखंड मिळणार

कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव

अनाथांना एक टक्का आरक्षण, राज्य सरकारचा मोठा निर्णय