मुंबई : वीज नियामक मंडळाने मुंबईतील रिलायन्स आणि टाटा पॉवर्सचे वीजदर जाहीर केले आहेत. 1 ऑक्टोबरपासून हे नवे घरगुती वीजदर लागु होणार आहेत. यात टाटा पॉवरची वीज जवळपास अडीच टक्क्याने महागली आहे, तर रिलायन्सची वीज स्वस्त झाली आहे.

मुंबईतील वीज पुरवढादार कंपनी रिलायन्सने मागितलेली 6 टक्क्यांची दरवाढ नाकारली आहे. तसंच रिलायन्सचे घरगुती विजेचे दर जवळपास दोन टक्क्यांनी कमी केले आहेत. दुसरीकडे टाटा पॉवर कंपनीने मागितलेली 17 टक्क्यांची कपात नाकारत अडीच टक्क्याने दरवाढ केली आहे.

मुंबईच्या वीजदरांमध्ये झालेले बदल पुढील चार वर्षांसाठी वैध असतील. नवीन दरबदलामुळे रिलायन्सच्या ग्राहकांना दिलासा मिळणार आहे, तर टाटाच्या ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे. वीज नियामक मंडळाने फिक्स चार्जेसमध्येही 10 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.