सांगली : महावितरणच्या बिलासंदर्भातील अनेक घोळ आपण सतत पाहत असतो. कधी कुणाचे बिल वीज वापरापेक्षा जास्त येते, तर कधी कमी येते. मात्र सांगलीत महावितरणने एकाला चक्क शून्य रुपयांचे लाईट बिल पाठवले आहे. यात महावितरणकडून झालेली हद्द म्हणजे हे जर बिल वेळेत भरले नाही, तर 10 रुपये दंड भरण्याची सूचना केली आहे. यामुळे ज्याला हे बिल आले आहे, तो नेमके हे बिल वेळेत कसे भरायचे या कोड्यात सापडला आहे.
सांगलीजवळील हरिपूरमध्ये राहुल महावीर वारद यांचा रांगोळी पॅकिंगचा व्यवसाय आहे. वारद यांना मे महिन्याचे वीज बिल आले आहे. तेव्हापासून वारद यांची हसावे की रडावे अशी त्याची अवस्था झाली आहे. कारण त्यांना या वीज बिलामध्ये देयक रक्कम म्हणजे बिल भरायची रकम ही शून्य रुपये आहे. मात्र जर ही रकम वेळेत न भरल्यास 10 रुपये दंड रुपात भरावे लागतील अशी सूचना या बिलात राहुल वारद यांना पाहायला मिळते आहे. यामुळे 10 रुपये दंड बसण्यापेक्षा वारद हे शून्य रुपये वेळेत भरायला तयार देखील आहेत. मात्र हे शून्य रुपये आणायचे कुठून हा त्याच्यासमोर प्रश्न पडला आहे.
वीज बिलाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकलीय. दंड स्वरुपातील 10 रुपये वाचवावेत म्हणून वीज बिलावरील रकम भरायला कोणी मदत करेल का, असा मिश्किल सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
राहुल यांनी महावितरणच्या लोकांना आपल्याला आलेल्या या हास्यास्पद बिलाची कहाणी सांगितली. त्यावर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी राहुल यांच्या प्लॉटवरचे मीटर, वीज बिल चेक केले. मात्र राहुल यांचे अॅडव्हान्स पैसे महावितरणकडे जमा असल्याने त्यांचे या महिन्याचे बिल वजा झाले असल्याने शून्य रुपये बिल आल्याचे महावितरणने त्यांना सांगितले. मग 10 रुपये दंड का, या प्रश्नाचे उत्तर मात्र महावितरणकडे सुद्धा नाही.
वीज बिल शून्य रुपये, मात्र वेळेत न भरल्यास 10 रुपये दंड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jun 2018 01:48 PM (IST)
वीज बिलाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर टाकलीय. दंड स्वरुपातील 10 रुपये वाचवावेत म्हणून वीज बिलावरील रकम भरायला कोणी मदत करेल का, असा मिश्किल सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -