साताऱ्यात वृद्ध महिलेला एसटी बसने चिरडलं
एबीपी माझा वेब टीम | 08 Jul 2018 05:53 PM (IST)
एसटीचे चाक अंगावरुन गेल्याने सातारा बसस्थानकात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी घडलेल्या या घटनेची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून बेजबाबदार एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एसटीचे चाक अंगावरुन गेल्याने सातारा बसस्थानकात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. आज दुपारी घडलेल्या या घटनेची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून बेजबाबदार एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्याच्या मध्यवर्ती बसस्थानकात हा अपघात घडला आहे. सांगलीमध्ये राहणाऱ्या शकुंतला जंगम नावाची महिला बससमोरुन जात होती. मात्र त्याचवेळी बसचालकाने बस सुरु करुन महिलेच्या अंगावर घातली. साताऱा-सांगली एसटी चालकाने महिलेला बसखाली चिरडलं आहे. दरम्यान पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.