Shiv Sena : शिंदे गटात सहभागी होण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांकडून शिवसैनिकांवर दबावतंत्र वापरले जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. जळगाव महापालिकेच्या जयश्री महाजन यांनाही विकास कामे करायची असतील तर आमच्यात सहभागी व्हा. अन्यथा कामात अडथळे आणले जातील अशा स्वरूपाचे मेसेज येत असल्याचा गंभीर आरोप महापौर जयश्री महाजन यांनी केला आहे.  तर युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला निधीची ऑफर.. देत शिंदे गटात येण्याचे आवाहन केले जात असल्याचं पदाधिकारी आता सांगत आहेत. 


शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांच्याकडून निधीची ऑफर..
जळगाव जिल्ह्यात एकीकडे उध्दव ठाकरे यांच्या समर्थकांना एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्यासाठी शिंदे गटातील सहभागी झालेल्या आमदारांसह मंत्री तसेच पदाधिकाऱ्यांकडून दबावतंत्राचा वापर केला जात आहे. शिंदे गटात सहभागी होण्यासाठी जळगाव महापालिकेच्या महापौर जयश्री महाजन यांना  विकास कामे करायची असल्यास आमच्यात सहभागी व्हा. अन्यथा विकास कामात अडथळे आणले जातील असे धमकी मेसेज आपल्याला येत आहेत. तर दुसरीकडे जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील युवासेनेचे विधानसभेचे क्षेत्र अधिकारी विजय लाड यांना निधीची ऑफर देण्यात आल्याचा प्रकार त्यांनी सांगितला  आहे.


जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह पाच आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले. या आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेचे तसेच युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. जळगाव महापालिकेच्या जयश्री महाजन यांना एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यासाठी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी धमकी देण्यात आली आहे.  शिंदे गटात सहभागी झाले तर शहराच्या  विकासकामांसाठी निधी देवून अन्यथा विकासकामांमध्ये अडचणी निर्माण केल्या जातील. या शब्दात महापौर जयश्री महाजन यांना शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आली आहे. मात्र याला मी बळी पडणार नाही, मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, जनतेचा शिवसैनिक म्हणून माझ्यावर जो विश्वास आहे, त्याला मी तडा जावू देणार नाही, असे महापौर जयश्री महाजन यांनी स्पष्ट केलंय..


जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील युवासेनेचे विधानसभा क्षेत्र अधिकारी विजय लाड यांच्यासह कार्यकर्त्यांना शिंदे गटात सहभागी होण्यासाठी शिंदे गटात सहभागी झालेले माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून निधीची ऑफर देण्यात आली आहे. गावात दहा लाखांची कामे देवून, दोन कोटींचा निधी देवू, शिंदे गटात सहभागी व्हावं, शिवसेनेचे आता भवितव्य नाही, अशा प्रकारे सांगण्यात येवून शिंदे गटात येण्याच आवाहन केलं जात आहे. मात्र ही ऑफर धुडकावून लावत शिवसैनिकांनी आम्ही कायम उध्दव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे सांगितलं आहे.


शिंदे सहभागी आमदारांकडून केल्या जात असलेल्या या घाणेरड्या राजकारणावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी कडक शब्दात टीका केलीय. कुठल्याही शिवसैनिकाला धमकी देवू नये, जो धमकी देईन, त्याला जनता त्यांची जागा दाखवेल, मातीत झोपविल्याशिवाय राहणार नाही, या शब्दात संजय सावंत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना इशारा दिला आहे.


 सत्तांतरणानंतर शिंदे गट जळगाव जिल्ह्यात वर्चस्व सिध्द करण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ संघटना बळकट करण्यासाठी शिवसेनेही कंबर कसल्याचे पहायला मिळत आहे. त्‍यामुळे आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट व उध्दव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात प्रतिष्ठेची लढाई पहायला मिळणार आहे.