मुंबई : शिवसेना पक्षात फूट पडल्यामुळे उघड-उघड दोन गट पडले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकाकडून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै अशा दोन दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित झाला आहे. संजय राऊतांकडून हा ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे.
संजय राऊत यांनी शेअर केलेल्या टिझरमध्ये सूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट असे शब्द ऐकायला मिळत आहे. या टिझरमध्ये धनुष्यबाण कोणाचा? ठाकरेंना शिवसेना खरी का खोटी याचे पुरावे द्यावे लागत आहे असे रोखठोख प्रश्न विचाारण्यात आले आहे. . शिवसेनेच्या बंडाळीनंतर सामनामधील ही पहिलीच मुलाखत असल्यामुळे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या टिझरने मुलाखतीची उत्सुकता वाढवली आहे.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत येत्या 26 आणि 27 जुलै अशा दोन दिवसांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या मुलाखतीमध्ये संजय राऊत उद्धव ठाकरेंना शिवसेनेतील बंड तसेच शिवसेना पक्षाची आगामी वाटचाल यावर प्रश्न विचारले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंड केले. त्यानंतर उद्धव ठाकरेंवर अनेक आरोप - प्रत्यारोप झाले. मात्र उद्धव ठाकरेंकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. या टिझरमध्ये संजय राऊतांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना बोलतं केलंय. आता पुन्हा एकदा सामान्य लोकांमधून असामान्य लोक घडवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत बंडखोरांना आवाहन दिले आहे.
राज्यातील शिवसेनेच्या खासदारांनीही शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही वेगळं झालो असल्याचा दावा शिंदे गटाने केला. अनैसर्गिक युतीमध्ये आमची घुसमट होत असल्याचे सांगितलं जात होते. आता शिवसेना कुणाची याची लढाई सुरु झाली आहे.. हे प्रकरण न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे आहे. लवकरच याबाबात सुनावणी होणार आहे. पण त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांची मुलाखत होणार आहे.