Eknath Shinde Top Search : एकनाथ शिंदेच्या बंडामुळे देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असतानाच आता पाकिस्तानमध्येही शिंदेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या राजकाराणाला हदरवून सोडणारे एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत याची उत्सुकता पाकच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानी नागरिक एकनाथ शिंदेंबाबत गुगलवरुन माहिती शोधण्याचा प्रयत्न करातायेत. पाकिस्तानातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी एकनाथ शिंदेंविषयी माहिती सर्च केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीसांना मागे टाकत एकनाथ शिंदे गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर आले आहेत. पाकिस्तानसोबतच सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान आणि कॅनडातही एकनाथ शिंदेंच्या नावाने गुगल सर्च केलं जात असल्याचं कळत आहे.


महाराष्ट्रातील राजकीय गरमागरमीची चर्चा ही केवळ राज्यात देशातच नाही तर जगभरात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.  33 देशांमध्ये तीन दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्वाधिक सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे हाते. शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानात 54 टक्के, सौदी अरेबियात 57 टक्के, मलेशिया 61 टक्के, नेपाळ 51 टक्के, बांगलादेश 42 टक्के, थायलंड 54 टक्के, जपान 59 टक्के, कॅनडात 55 टक्के लोकांनी सर्च केले


दरम्यान भारतात एकनाथ शिंदे यांची जात कोणती आहे? याबाबत देखील खूप जास्त प्रमाणात सर्च केलं जात आहे. शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळं राज्यातील महाविकास सरकार संकटात सापडलं आहे.   


भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर?


भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याची अट उद्धव ठाकरेंसमोर ठेवली होती. या बंडानंतर आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या 37 आमदारांसह एकूण 46 आमदार असल्याचं बोललं जात आहे. तर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील नेते सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. 



इतर महत्वाच्या बातम्या


Uddhav Thackeray : जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे यांचे विभागप्रमुखांना आदेश


Maharashtra Political crisis : 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करा, शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी


Maharashtra Political Crisis Eknath Shinde LIVE : राज्यातील सत्तासंघर्षाचा चौथा दिवस, अपडेट्स एका क्लिकवर..