मुंबई : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी येथे उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार नाहीत. त्यांना सोहळ्याचे आमंत्रण आले आहे, पण त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. ट्वीट करत याबाबतची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच अयोध्येला सर्व मंत्रिमंडळासह जाणार असल्याचेही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे.  अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.


ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे काय म्हणाले ?


जय श्री राम‌‌..! अयोध्येत राम मंदीर उभारणीचे कोट्यवधी भारतीय आणि रामभक्त तसेच हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी साकार केलं आहे. मोदीजींचे शतशः आभार... 


अयोध्येमध्ये सोमवारी श्री प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची  प्राणप्रतिष्ठा होत आहे. या ऐतिहासिक आणि नेत्रदीपक सोहळ्याचे आम्हाला निमंत्रण आहेच. देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजितदादा पवार अशा तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रीमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्त अशा सर्वांना घेऊन प्रभू श्रीराम यांचं दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत.  




कसे आहेत अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहोळ्याचे निमंत्रण?


रामजन्मभूमी ट्रस्टने निवडणूक आयोगाकडून यादी घेऊन देशातील नोंदणीकृत पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रित केले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना निमंत्रणे आली आहेत.एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे अध्यक्ष म्हणून निमंत्रण आले आहे, तर अजित पवार यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून. त्याच न्यायाने राष्ट्रवादीच्या दुसर्‍या गटाचे प्रमुख म्हणून शरद पवार, वंचित बहुजनचे प्रकाश आंबेडकर इत्यादी नेत्यांना निमंत्रण देण्यात आली आहेत. क्रिकेट, सिनेमा, उद्योग इत्यादी क्षेत्रातील सेलिब्रिटीज यांना सुद्धा निमंत्रण दिली आहेत. देशातील कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही. केवळ राजशिष्टाचाराचा भाग म्हणून उत्तरप्रदेशात कार्यक्रम होत असल्याने तेथील राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना निमंत्रण दिले आहे. भाजपाचे निमंत्रण हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे.पी. नड्डा यांना. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष यांना निमंत्रण नाही.याशिवाय, 8000 निमंत्रितांमध्ये मोठा घटक हा देशभरातील संत-महंत. महाराष्ट्रातून अशा 409 संत-महतांना निमंत्रण