Eknath Shinde : सर्वांना घर देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi ) यांचे स्वप्न आहे. त्यात पुढाकार घेऊन आपण काम केलं पाहिजे असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. एक इंचही अतिक्रमण होता कामा नये, यावर तुमचा फोकस असला पाहिजे. भविष्यात नवीन झोपडपट्टी होता कामा नये, अनधिकृत बांधकामे होऊ नयेत असेही एकनाथ शिंदे म्हणाले. पुण्यात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दर्जेदार काम करुन घेणे हे अधिकाऱ्यांचे काम
आपण फील्ड वर गेलं पाहिजे, आम्ही फील्ड वर गेलो, तेव्हाच आम्हाला समजतं असेही एकनाथ शिंदे म्हणाले. फील्डवर गेलो तेव्हाच इतरांवर दबाव होतो, पैसे तर देतोच आपण त्यांना, दर्जेदार काम करुन घेणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. पैसे देऊन काम खराब झालं तर विरोधी पक्षाला आयते कोलीत मिळतं असेही एकनाथ शिंदे म्हणाले. महिन्याला महत्त्वाचा प्रकल्पाला फिल्ड व्हिझीट झालीच पाहिजे असंही एकनाथ शिंदे म्हणाले. नवीन यू डी सी पी आरमध्ये अनेक बदल आपण केले आहेत. महायुतीचे सरकार आल्यावर आपण आपल्यामध्ये आलेले स्पीडब्रेकर काढून टाकल्याचे शिंदे म्हणाले.
डबल इंजिनटं सरकार वेगवान काम करतंय
स्मार्ट सिटीसाठी खूप मोठा निधी आपण दिला आहे. राज्याला सुद्धा best performing State हा पुरस्कार मिळाला आहे. एफडीआयमध्ये राज्य पाहिलं आहे. मुख्यमंत्री यांनी दावोस येथे जाऊन एमओयू केले आहेत. त्यामुळं सुद्धा रोजगार निर्मिती होणार आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. डबल इंजिनटं सरकार वेगवान काम करताना दिसत आहे. त्यामुळं जबाबदारी वाढली आहे. अधिक वेगवान कामाची अपेक्षा आपल्याकडून असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. मी पण नगरसेवक होतो, देवेंद्र जी महापौर होते, मी सभागृह नेत्यापर्यंत गेलो तिथून आमदार झालो आम्हाला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन्हीचा अनुभव असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
नागपूर शहरामध्ये विकास चांगला होतोय. इतर राज्यात काय केलं आहे हे आपण पाहायला पाहिजे. इंदौर, चेन्नईमध्ये काय केलं आहे हे पाहायला पाहिजे असेही एकनाथ शिंदे म्हणाले. प्रत्येक शहर मुख्य प्रवाहात आलं पाहिजे असंही एकनाथ शिंदे म्हणाले. S
महत्वाच्या बातम्या:
शाहू महाराज... मी कोल्हापूरसाठी निधी कमी पडू देणार नाही, विकासकामात भेदभाव करत नाही: एकनाथ शिंदे