Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)  यांची आणि पतित पावन संघटनेची (Patit Pawan Sanghatana) विचारधारा एकच आहे. राजकीय विषयावर नाही तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी केले. पतीत पावन संघटना आमच्यासोबत आल्यामुळे दोन्ही संघटनांना बळ मिळणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही महायुतीचाच भगवा फडकेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. जागा किती मिळतील यापेक्षा विचारधारेला आमचं महत्त्व आहे. खुर्चीचा किंवा जागेचा अजेंडा आमचा नाही तर विकासाचा असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

Continues below advertisement

पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेच्या युतीची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी ते बोलत होते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती होणार आहे. पुण्यात भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजीत केला होता. यावेळी ही घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यमंत्री योगेश कदम हे देखील उपस्थित होते. 

पतीत पावन संघटना आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वासाठी

पतीत पावन संघटना आणि शिवसेनेची युती ही हिंदुत्वासाठी झाली आहे. आमची युती निवडणुका लढवण्यासाठी नाही तर विचारांसाठी झाली आहे. महायुती म्हणून आम्ही लोकसभा विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळवलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा महायुतीच जिंकणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंढवा जमीन प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं आहे योग्य ती कारवाई केली जाईल असे ते म्हणाले. कुठलीही चुकीची व्यवहार झाला असेल तर तो चूकच आहे त्याची चौकशी होईल. महापालिका महायुती म्हणून लढणार आहे. आणखी महापालिका निवडणुका जाहीर झाल्या नाहीत. त्यामुळं किती जागा लढण्याचा प्रश्न येत नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

Continues below advertisement

पार्थ पवार मुंढवा जागे प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं आहे

पार्थ पवार मुंढवा जागे प्रकरणी देखील एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. चौकशी लावलेली आहे. दूध का दूध पाणी का पाणी होईल असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत असे एकनाथ शिंदे म्हणाले. कुठलाही गैरप्रकार सरकार खपवून घेणार नाही. कुणालाही पाठीशी घालणार नाही, असेही ते म्हणाले. रवींद्र धगेकर आणि भाजप वाद हा विषय आता संपलेला आहे. त्याला पुन्हा तुम्ही जिवंत करू नका असेही एकनाथ शिंदे म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Rohit Pawar on Parth Pawar Pune Land Scam: मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार, अजितदादांच्या मुलाचं प्रकरण बाहेर येताच रोहित पवारांचा मोठा दावा