Eknath Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभाराला आणि एनडीएला आज 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. मोदींनी देशाची सुत्रे हातात घेतल्यानंतर पूर्ण बदल होत असल्याचे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. 2014 च्या अगोदर रोज भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या बातम्या समोर येत होत्या. मात्र, 2014 च्या नंतर अशी हिंमत कोणी केले नाही. मोदींवर एकही डाग नसल्याचे शंदे म्हणाले. 11 वर्षे मोदींनी यशस्वी पंतप्रधान म्हणून काम केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
गेल्या 11 वर्षांत एकही घोटाळ्याची माहिती समोर आली नाही.
गेल्या अकरा वर्षांत एकही घोटाळ्याची माहिती समोर आली नाही. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. यानंतर भारताने आतंकवाद्यांना धडा शिकवला आहे. भारताची ताकत वाढली आहे. 21 वी सदी नरेंद्र मोदी असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी बाहेर जाऊन देशाची बदनामी करतात. राहुल गांधी हे मोदींवर टीका करतात म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ज्या पंतप्रधानांनी देशाला पुढे नेले त्यांच्यावर तुम्ही टीका करता असे एकनाथ शिंदे म्हणाले. देश की जनता नहीं आँधी कुच भी करो राहुल गांधी. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ नये म्हणून सर्व पक्ष एकत्र आले मात्र शेवटी मोदी आलेच ना असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
जे मुंबई सोडून बाहेर गेले त्या सर्वाना मुंबईत आणणार
धारावीच्या मुद्यावरुनही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर टीका केली. धरावीमध्ये कसे लोक राहतात हे बघा, नाले गटार मच्छर आहेत. एका घरात दहा दहा लोक राहतात. धारावी पुनर्वसनचा मालक सरकार आहे. वस्तुस्थिती जाणून घ्या असे एकनाथ शिंदे म्हणाले. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना फायदा होईल ते काम केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही पात्र लोकांना घर द्या म्हटले मी तर सर्वाना घर द्या म्हणतो असेही शिंदे म्हगणाले. जे मुंबई सोडून बाहेर गेले त्या सर्वाना मुंबईत आणणार असल्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले. रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. निवडणूक आली की मुंबईचा लढा असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला.
लाडकी बहीण योजना शेतकरी सन्मान योजना सुरु केल्या
ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांनी देखील प्रवेश केला सर्वांचे शिवसेनेत स्वागत असल्याचे शिंदे म्हणाले. धाने पाटील अनुभवी आहेत त्यांची हकीगत त्यांनी स्वतः सांगितली आहे. तुम्ही स्वगृही बाळासाहेबांच्या धनुषबाण शिवसेनेत आलेत. धाने पाटील यांच्या सौभाग्यवती या त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत म्हणून ते तुम्हाला जा म्हटले. महायुती सरकारने जे प्रकल्प रखडलेले होते ते सुरु केले विकास प्रकल्प पुढे नेतो. लाडकी बहीण योजना शेतकरी सन्मान योजना अशा अनेक योजना सुरू केल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. विरोधी पक्षाला विरोधी पक्षात राहण्यासाठी देखील आकडेवारी मिळाली नाही असे शिंदे म्हणाले. लोकसभा आणि विधानसभेमध्ये चांगले यश मिळाले आहे. जनतेने धनुष्यबाण शिवसेनेवर विश्वास दाखवला आणि पोचपावती दिली्याचे शिंदे म्हणाले. अनेक कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत येतात हा पक्ष कार्यकर्त्यांच आहे आंनद दिघे यांची शिकवण आचरणात आणली आणि पुढे जातोय असे शिंदे म्हणाले. महारष्ट्रभरातून शिवसैनिक आपल्या पक्षात येत आहेत. चंद्रहार पाटील यांनी देखील प्रवेश केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Vilas Shinde : आठवडाभरात एकनाथ शिंदेंची दोनदा भेट, सुधाकर बडगुजरांवर हल्लाबोल करत आता नाराज विलास शिंदे राऊतांच्या भेटीला