Eknath Shinde : जिथे पूर (Flood) परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना कोकण विभागाची बैठक (Konkan Division Meeting) घेतलीय यावेळी त्यांनी विविध सुचना दिल्या आहेत. सर्व यंत्राने अलर्ट मोडवर आहेत. जिथे पाणी साचले तिथून लोकांना बाजूला केलं आहे. चिंता करण्याची बाब नाही. सर्वांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Continues below advertisement

शाळा महाविद्यालयासह, धोकादायक इमारतींवर लक्ष ठेवायला सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी फोन अटेंड करावेत जेणेकरुन बचत मदत कार्य तत्काळ करता येईल. झाडे पडून विजेच्या तारा तुटू शकतात. स्विमर बोटी तैनात आहेत. मासेमारीसाठी जे गेले आहेत त्यांना पुन्हा बोलावले आहे. धरण क्षेत्रात लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. 

कोकण विभागात सर्व यंत्राने तैनात 

कोकण विभागात सर्व यंत्राने तैनात आहेत. काही होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. नागरिकांचे जीवन धोक्यात येणार नाही यासाठी शासन कार्यरत आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. खडवली पूल पाण्याखाली गेला आहे. आताच त्याबाबत महिती समोर आली आहे. त्याठिकाणी देखील यंत्रणा तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

Continues below advertisement

मदत देताना कशावर बोट ठेवले जाणार नाही

मराठवाड्यात देखील सकाळी आढावा घेतला आहे. सर्व त्या ठिकाणी ऑन फील्ड असून अलर्ट मोडवर सर्व आहेत. मदत पोहोचत आहे. अन्य धान्य जीवन आवश्यक वस्तू पोहोचवत आहेत. बळीराजाच्या माता भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहेत. सर्व ठिकाणी व्हिजीट होत आहेत. मदत देताना कशावर बोट ठेवले जाणार नाही. काही अटी शर्ती आहेत त्या शिथील कराव्या लागतील असे एकनाथ शिंदे म्हणाले. 

राजकारण करण्याची वेळ नाही, शेतकऱ्यांसोबत एकत्र उभे राहण्याची वेळ 

इथे राजकारण करण्याची वेळ नाही. इथे काय राजकारण करता? असा टोला एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊतांना लगावला. प्रताप सरनाईक तिथे गेले होते सर्व मदत त्यांनी केली. ही राजकारणाची वेळ नाही सर्वांनी मिळून शेतकऱ्यांसोबत एकत्र उभे राहण्याची वेळ आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. उल्हास नदीबाबत अफवा पसरवू नये. कोणी  अफवा पसरवत असेल तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असेही एकनाथ शिंदे म्हणाले.