Shirdi Saibaba Sansthan : महाराष्ट्रात सर्वत्र सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे (Maharashtra Rains) अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे (Crop Damage) मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाडा विभागाला बसला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व मंत्र्यांना दुष्काळी भागांचे दौरे करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. तर बळीराजाच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था मदतीचा हात देत आहेत. आता शिर्डीच्या साईबाबा संस्थानने (Shirdi Saibaba Sansthan) सामाजिक बांधिलकी जपली आहे. 

Continues below advertisement

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटींची मदत जाहीर (Shirdi Saibaba Sansthan)

शिर्डीच्या साईबाबा संस्थानने आपल्या सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण दाखवून संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी (Chief Minister Relief Fund) एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीचा वापर राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने मदत पुरवण्यासाठी केला जाणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे घरबार विस्कळीत झाले आहेत. अशा वेळी साईबाबा संस्थानने आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय देत मदत जाहीर करणे महत्वाचे ठरले आहे.

धुळे पोलिसांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 2 लाखांचा निधी (Dhule Police Donation)

राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती असताना, धुळे जिल्ह्यातील 50 पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारातून दोन लाख रुपये गोळा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी चेक सुपूर्त केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिला आहे.

Continues below advertisement

शिर्डीत पावसामुळे मोठा पुर, शहर जलमय (Shirdi Rains)

दरम्यान, शिर्डीत काल रात्रीपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहर पूर्णपणे जलमय झाले आहे. कालिका नगरमधील काही घरांमध्ये पाणी घुसले असून, नगर ते मनमाड महामार्गापर्यंत परिसर पाण्याखाली आहे. पावसाने काही वेळ विश्रांती घेतल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, शिर्डीत रात्री दोन जण ओढ्यात वाहून गेले होते, मात्र प्रशासनाने त्यांना वाचवले आहे.

आणखी वाचा 

North Maharashtra Rain : पावसाचं तांडव! पोल्ट्री फॉर्मची भिंत कोसळून 800 कोंबड्या दगावल्या, अनेक भागात शिरलं पाणी; नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कोसळधार