Eknath Shinde Dasara Melava LIVE : मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, पण विरोधक कोर्टात गेले; एकनाथ शिंदेंची टीका

Eknath Shinde Dasara Melava LIVE : विधानसभेच्या निवडणुकीआधी यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असून त्याचे प्रत्येक अपडेट्स या ठिकाणी वाचायला मिळतील. 

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 12 Oct 2024 08:42 PM
Eknath Shinde Dasara Melava LIVE : लोकसभेप्रमाणे मतदानावेळी सुट्टीवर जाऊ नका, विधानसभेचा विजय भव्य-दिव्य असला पाहिजे; एकनाथ शिंदेंचे मतदारांना आवाहन

लोकसभेत तिकडे एक गठ्ठा मतदान झाले. पण आपण सुट्टी बघून फिरायला गेलो. हे पुन्हा होईल का? आता मतदार यादी तपासायला हवी. सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोचवा. तुम्हाला मान खाली घालयला आम्ही सांगितले नाही, ताठ मानेने जगायला शिकवले आहे. आज दसरा आहे, असत्याचा रावण आपल्याला गाडून टाकायचा आहे. विधानसभेचा विजय भव्य दिव्य असला पाहिजे. निर्धार करा विरोधकांना चारही मुंड्या चीत करण्याचा. राज्यात आज जे वातावरण आहे ते समृद्ध आहे. हे आपण केलं ते येणाऱ्या काळात महाराष्ट्रावर शिवरायांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं, पण विरोधक कोर्टात गेले; एकनाथ शिंदेंची टीका

या सरकारने आधीच्या दसरा मेळाव्याला शपथ घेतली होती, मराठा समाजाला आरक्षण देणार. आम्ही ताबडतोब आरक्षण दिलं. पण कोर्टात कोण गेले? तरीही कोर्टाने मराठा आरक्षण अजून कायम ठेवले आहे. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : ही जनता महायुतीला मोठं करणार, माझ्या लाडक्या बहिणी या सरकारच्या ब्रँड ॲम्बेसेडर : एकनाथ शिंदे

आता निवडणूक येणार असून राज्यातील जनता महायुतीला मोठं करणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, माझ्या लाडक्या बहिणी या सरकारच्या ब्रँड ॲम्बेसेडर झाल्या आहेत. लाडके भाऊ ब्रँड ॲम्बेसेडर झालेत. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीत जात नाही, प्रकल्प आणण्यासाठी जातो; एकनाथ शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

आम्ही दिल्लीला जातो प्रकल्प आणण्यासाठी, मला मुख्यमंत्री करा सांगायला जात नाही. पंतप्रधानांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यादिवशी आशाताई यांनी देखील आमच्या सरकारचे कौतुक केलं. सरकारची योजना गोरगरिबांना मदत करणारी आहे. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : तुम्ही शिवसेनेचा भगवा बदलण्याचा प्रयत्न केला, आम्ही तुमचाच रंग बदलला; शिंदेंची ठाकरेंवर टीका

तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला, आम्ही तुमचाच रंग बदलला. अशा लोकांसोबत बाळासाहेब कधीही राहिले नसते.बाळासाहेबांची सगळी स्वप्नं कुणी पूर्ण केली तर प्रधानमंत्री मोदी यांनी केली. ठाकरे म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार. मला सोडा दुसऱ्याला बनवायचे होते, पण हे स्वतःच मुख्यमंत्रिपदी बसले. मोदींनी ते केलं आणि मला मुख्यमंत्री बनवलं. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी : एकनाथ शिंदे

सहा महिन्यात आमचं सरकार पडणार असं ठाकरे म्हणत होते, पण घासून-पुसून नव्हे तर ठासून दोन वर्षे पूर्ण केली अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. माझी दाढी यांना खुपते, पण होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी असा टोलाही शिंदे यांनी लगावला. शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.

बाळासाहेबांची स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केली : एकनाथ शिंदे 

तुम्ही शिवसेनेचा भगवा रंग बदलण्याचा प्रयत्न केला तुमचाच रंग बदलला. अश्या लोकांसमोर बाळासाहेब कधीही राहिले नसते.  बाळासाहेबांची सगळी स्वप्न कोणी पूर्ण केली तर प्रधानमंत्री मोदी यांनी केली. हे म्हणत होते शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणारे मला सोडा दुसऱ्याला बनवायचे होते पण हे स्वतःच बसले, मोदींनी हे केलं आणि मला मुख्यमंत्री बनवला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : जिथे टेंडर, तिथे सरेंडर हे ठाकरेंचे धोरण; एकनाथ शिंदेंची टीका

जिथे टेंडर तिथे सरेंडर. कंत्राटदारांची लूट करताना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी होती. धारावी मुंबईचा विकास होईल हे सगळं मी पाहतोय. धारावी इथे देखील प्रकल्पात काड्या घालण्याचे काम सुरू आहे. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधा, पण धाराविकरांना रस्त्यावर ठेवा. धारावीत आम्ही 2 लाख 10 जणांना घरे देणार, पात्र अपात्र बघणार नाही. 2 लाख कोटी रुपयांची घरे देणार. प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण आम्ही करणार. 

एकनाथ शिंदे पुरून उरला, मी घासून पुसून नाही ठासून 2 वर्ष पूर्ण केले : एकनाथ शिंदे

हिंदू म्हणायला आपल्याला स्वाभिमान आणि अभिमान वाटतो. पण काही गार गोट्यांना लाज वाटते.  आपण ही शिवसेना मुक्त केली, आझाद शिवसैनिकांची ही आझाद शिवसेना आहे. मी सगळ्यांचे स्वागत करतो. आज भगवा संचारला आहे. हे सरकार पंधरा दिवस, एक महिना, सहा महिन्यात पडेल, असे म्हणत होते पण एकनाथ शिंदे पुरून उरला. मी घासून पुसून नाही ठासून 2 वर्ष पूर्ण केले, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, हेच उद्धव ठाकरेंना चोख उत्तर : रामदास कदम

बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. लाडके भाऊ  सीएम आहेत. पंतप्रधान याचे आभार मानतो.  मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. उद्धव ठाकरे आणि राऊत यांना दिलेले चोख उत्तर म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा पीएम साहेबांनी दिला आहे.  राज्यातील अनेक योजना सीएम लोकांपर्यंत पोहोचत आहेत,लोक भगवा झेंडा फडकवला शिवाय राहणार नाहीत, असं रामदास कदम म्हणाले. 

गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर टीका

गुलाबराव पाटील काय काय म्हणाले? 


40 वर्षापासून होत असलेल्या मेळाव्याची आठवण होते,आज शिवसैनिकांना बाळासाहेब याची आठवण नक्की होत असेल. आम्ही साहेब कधी बोलणार याची वाट पाहत होतो. लोकसभा निवडणूक झाल्यावर वेगळ चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला,आता सरकार येणार नाही अस सांगण्यात आल,पण शिंदे साहेब यांनी जादू केली. माझ्या जिल्ह्यात सी एम साहेब दोन वर्षात 14 वेळा आलेले पहिले मुख्यमंत्री आहेत. कव्वा कितनी भी उंचाई छुले कुबतर नही बन सकता,हे मी संजय राऊताला सांगतोय. 

Sanjay Raut: आदित्य तुम्ही लहान राहिलेला नाहीत, महाराष्ट्र आपल्या नेतृत्वाखाली लढायला तयार : संजय राऊत

Sanjay Raut:  शिवसेनेच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे असं मी मानतो .  वडिलांसमोर भाषण केलं नाही असं तुम्ही सांगितलं /मात्र इतकंच सांगतो आपण लहान मुल राहिलेला नाहीत, महाराष्ट्र आपल्याकडे फार अपेक्षेने पाहातो.   लढणार का तुम्ही विचारलं तेव्हा ठाकरेंच्याच मागे महाराष्ट्र उभा राहिलेला आहे.  महाराष्ट्र आपल्या नेतृत्वाखाली लढायला तयार आहे. मशालीसारखं चिन्ह दुसरं कोणतं नाही, असे संजय राऊत म्हणाले.  

Eknath Shinde Dasara Melava LIVE : मुख्यमंत्रिपदासाठी कुठे-कुठे जाऊन भीक मागता? ज्योती वाघमारेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

ज्योती वाघमारे काय म्हणाल्या? 


स्वाभिमानी शिवसैनिकांना मानाचा मुजरा. शिवसैनिक कोणासमोर वाकत नाही. जो धनुष्यबाण काँग्रेसकडे गहाण ठेवला होता तो स्वाभिमानी मुख्यमंत्री यांनी सोडवून आणला. जे नेहमी बोलतात आमचा बाप चोराला, 2019 निवडणुकीत भगवा असलेला रंग बदलला कसा?


उद्धव ठाकरे मातोश्री नाव बदलून आमिजान ठेवणार आहेत असं कळतय, आम्हाला सांगा कुठे कुठे जाऊन भिक मागता? मला मुख्यमंत्रीपद जाहीर करा असं म्हणता. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री स्वाभिमानाने काम करत आहेत. आज माविआ मध्ये कौन बनेगा मुख्यमंत्री असा खेळ सुरू आहे.  श्रीकांत शिंदे यांना कार्टं म्हणता मग तुमच्या मुलाला कार्टून म्हणायचं का? 


एका कार्टून काय काय करतात, दुसरं कार्टून अंबानी यांच्या लग्नात नाचतो. शिंदे बाळासाहेब याचे विचार पुत्र ठरले आहेत. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : ठाकरेंकडून फक्त शिवीगाळ अपेक्षीत, हिंदुत्वाचा मुद्दा आम्हीच पुढे नेतोय : शंभुराज देसाई

शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई म्हणाले की, दादरच्या मेळाव्यातून टीका शिवीगाळच ऐकायला मिळेल, त्यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. हिंदुत्वाचे ज्वलंत विचार आम्ही पुढे नेत आहोत. मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलेले आहे. जरांगे पाटलांच्या मागणीनुसार सकारात्मक चर्चा सुरू आहे. विधानसभेला आमच्या जागांचे निर्णय आम्हीच घेणार. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याचे लाईव्ह टेलिकास्ट पाहा,


https://www.youtube.com/watch?v=1sv_DGyU2Po 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : आझाद मैदानात महिलांची गर्दी वाढतेय, लाडकी बहीण आनंदी असल्याच्या प्रतिक्रिया

आझाद मैदानातील मेळावासाठी शिवसैनिक सीएसटीएमला पोहचत आहेत. यात महिलांची संख्याही मोठी आहे. असा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही, लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते मिळाले असून राज्यातील महिला आनंदी असल्याचा दावा या महिलांनी केला आहे. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : शिंदेंच्या मेळाव्यात, आझाद मैदानावर पावसाची हजेरी

मुंबईत दोन्ही शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांची लगबग वाढलीय. असं असतानाच पावसालाही सुरुवात झाल्याचं दिसतंय. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत असलेल्या आझाद मैदानावर पावसानं हजेरी लावली आहे. तर तिकडे ठाकरेंचा मेळावा होत असलेल्या शिवाजी पार्कच्या परिसरातही वातावरण ढगाळ झालं आहे. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : शिंदेंच्या मेळाव्यात लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी अनुभव सांगणार 

शिंदेंच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम, गुलाबराव पाटील, ज्योती वाघमारे भाषण करणार आहेत. शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं सूत्रसंचालन खासदार नरेश म्हस्के करणार आहेत. लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी शिंदेंच्या स्टेजवर अनुभव सांगण्याची शक्यता आहे. 

Eknath Shinde Dasara Melava LIVE : शिंदेंच्या मेळाव्याच्या ठिकाणी पावसाची शक्यता

मध्य मुंबईत देखील ढगाळ वातावरण झालंय. दादर परिसरात देखील पावसाची शक्यता आहे…


मुंबई आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता…


वाऱ्यांचा वेग ३०-४० किमी प्रति तास राहण्याचा अंदाज 


मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून मुंबईसाठी आज पावसाचा यलो अलर्ट आहे. 


याचा परिणाम शिंदेंच्या दसरा मेळाव्यावर होण्याची शक्यता आहे. 

पार्श्वभूमी

Eknath Shinde Dasara Melava LIVE : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर होणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा बीकेसीत होणार असल्याची चर्चा होती. पण गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आझाद मैदानात पार पडणार आहे. शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यानिमित्ताने हजारोच्या संख्येने कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून शहरातून आझाद मैदानावर दाखल होत आहेत. या सगळ्या कार्यकर्त्यांची खास जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे जवळपास 40 ते 50 हजार लोक जेवतील अशी तयारी या ठिकाणी सुरू आहे. त्यासाठी मसाले भात आणि कोशिंबीर असा मेन्यू आहे. 


आझाद मैदानावर एकनाथ शिंदेंच्या मेळाव्याची जय्यत तयारी झाली असून त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते रडारवर असणार आहेत.


 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.