Eknath Shinde Dasara Melava 2023 Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरुन उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी खोक्याला कंटेनर असे उत्तर दिले. त्याशिवाय 2004 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते. मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना पवारांकडे दोन माणसे पाठवली होती, असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी केला. त्याशिवाय शिवसेना उद्या काँग्रेसमध्ये विलीन झाली तर आश्चर्य वाटायला नको, असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे पाहूयात.. 


एकनाथ शिंदेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे -


बाळासाहेबांचे विचार हेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. हिंदूत्वाची गद्दारी तुम्ही केलीय. खुर्चीसाठी तुम्ही किती गद्दारी केलीय. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही तिलांजली दिलीय. कँग्रेस, समाजवादींना तुम्ही डोक्यावर घेतलंय. उद्या एमआयएम आणि ओवेसीसोबत युती करतील. 


 राज्यभरातून आलेल्या शिवसैनिकांची भगवी लाट उसळली आहे. कळू देत सगळ्यांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नक्की कुठे आहे..? आजचा मेळावा आझाद शिवसेनेचा आझाद मैदानावर होतोय..हा एकनाथ शिंदे याच मैदानावर बसून दसरा मेळाव्याला यायचो. गुलाल उधळत कार्यकर्त्यांना घेऊन यायचो. बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू है हाक दिली आणि हिंदुत्वाची लाट देशभरात उसळली.  बाळासाहेबांचे विचार हेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे. लोकप्रतिनिधीत्व धोक्यात आल्यास देखील त्यांनी हिंदुत्व सोडले नाही. 


गेल्यावेळीच शिवतीर्थावर मेळावा घेऊ शकलो असतो, पण मी म्हंटल जिथे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मुक्तपणे मांडता येतात, तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहे.
ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला ज्या मणिशंकर आययरला बाळासाहेब ठाकरेंनी जोडे मारले त्यांच्यासाठी पायघड्या टाकतायत..


शिवसेनेची काँग्रेस झाली तर दुकान बंद करीन म्हणणारे बाळासाहेब आणि आता कदाचित उरली सुरली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन केली तर आश्चर्य वाटायला नको...
उद्या एम आय एम ओवेसी सोबत युती करतील. हमास हिजबुल लष्कर ए तोयबा यांच्याशी देखील युती करतील. शिवसैनिक जगला काय मेला काय त्यांचं याना काही नाही फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढच याना माहित. 


सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही... करणार नाही. रक्ताचं नाते सांगणाऱ्यांनी हिंदुत्वचा गळा घोटला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना आम्हाला दिल्यानंतर यांनी बँकमधील 50 कोटी रुपये मागितले.. पण बँकने नकार दिला. मी 50 कोटी रुपये द्यायला लावले. खोके त्यांना पुरत नाही... त्यांना कंटेनर हवा. मी साक्षीदार आहे.. योग्य वेळी बोलेन. 


तो दसरा मेळावा नाही... शिमगा आहे. आता तिकडे टोमणे सभा सुरु असेल. दसरा मेळावा शिमगाला घ्यावा. पवार साहेबांकडे 2 माणसे पाठवली आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या नावाची शिफारस करायला लावली. 2004 पासून यांना मुख्यमंत्री व्हायचं होते. सीतेच हरण करण्यासाठी रावणाने साधूचं रूप घेतले होते... पण मुख्यमंत्री होण्यासाठी हे संधीसाधू बनले. 


तुमच्यावर किती केसेस आहेत? किती लाठया खाल्ल्या ते सांगा.  तुमची बँक देना नव्हती तर लेना बँक होती.  बाळासाहेबचा वारसा सांगणाऱ्यानी आपला चेहरा आरसामध्ये पाहावा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तरी काही बदल झाला का? काल मी कार्यकर्ता, आज आणि उद्या कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे. आजही रस्त्यावर उतरून काम करत आहे -... शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्ह्णून तुम्हाला का पोटशूल उठला आहे? - 


मी अजूनही कार्यकर्ता आहे. आनंद दिघे माझ्या पाठीशी उभे राहिले नसते तर हा एकनाथ शिंदे दिसला नसता. किती काही केले तरी मी मागे हटणार नाही.


मुंबई महापालिका कामात दरवशी तुम्ही करोडो रुपये घेऊन काळ्याचं पांढरं करत होता. दरवर्षी पैसे खान्याचा मार्ग आम्ही बंद केला. आम्ही या पावसाळ्यात मुंबईत पाणी भरू दिले नाही.