तथ्यहीन आरोपांना उत्तर देणार नाही : खडसे
एबीपी माझा वेब टीम | 03 Jun 2016 02:45 PM (IST)
मुंबई : अज्ञातवासात असलेले महसूलमंत्री एकनाथ खडसेंचं प्रसार माध्यमांना दर्शन झालं. मोबाईल क्लीप आणि ट्विटरच्या माध्यमातून खडसेंनी मला शेतकऱ्यांसाठी काम करु द्या असं आवाहन केलं आहे. माझ्याविरोधातील सगळे आरोप हा नियोजित कटाचा भाग आहे, म्हणत एकनाथ खडसेंनी स्वकीयांवरच निशाणा साधला आहे. खडसेंनी ट्विटरवर म्हटलं आहे की, "मी मीडियाला विनंती करतो की, एक जबाबदार कृषीमंत्री म्हणून मी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष देत आहे. तथ्यहीन आणि नियोजित आरोपांना मला उत्तरं देण्याऐवजी मला माझी कामं करु द्या." दरम्यान, पक्षाची भूमिका एकनाथ खडसेंना कळवा, असा आदेश भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आज दिला. त्यानंतर गडकरी आणि खडसे यांच्यात फोनवर बातचीत झाली. मात्र गडकरी आणि खडसे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप समजू शकलेलं नाही. खडसेंवरील आरोप * कथित पीए गजानन पाटीलकडून खडसेंच्या नावे 30 कोटी लाच मागितल्याचा आरोप, गजानन पाटीलला अटक * जावयाची लिमोझिन कार बेकायदा असल्याचा आरोप * दाऊदच्या कॉलर लिस्टमध्ये खडसेंचा नंबर असल्याचा हॅकरचा दावा * भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी वाद संबंधित बातम्या