देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. महाराष्ट्रात 17 तारखेपर्यंत सर्वदूर अतिमुसळधार पावसाचा इशारा, राज्यावर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचं सावट; पीक वाचवण्याचं शेतकऱ्यांसमोर आव्हान


2. मंदिरावरुन लेटर वॉरनंतर आमदार नियुक्तीवरुन राज्यपाल आणि मुख्यमंत्री आमनेसामने येण्याची चिन्ह; मंत्रिमंडळाच्या बैठकीत आमदारांच्या नावाच्या प्रस्तावाची शक्यता


3. राज्यपालांचं पत्र मीडियात प्रसिद्ध झाल्याने आणि पत्रातील भाषा वाचून धक्का बसला; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून शरद पवारांची नाराजी


4. मुंबई, ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ट्वीटद्वारे दावा


5. पुण्यात आजपासून क्रिकेट, खो-खोसारख्या मैदानी खेळांना अटी-शर्तींसह परवानगी, पुणे महापालिका आयुक्तांच्या घोषणेने मुलांना मोठा दिलासा


6. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना वरळी पोलिसांकडून कारणे दाखवा नोटीस, द्वेष पसरवल्याप्रकरणी कारवाई का करु नये म्हणून विचारणा


7. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच एसी लोकल रुळावर, तर 15 ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर लोकल फेऱ्यांमध्येही वाढ, आता 506 ऐवजी 700 लोकल धावणार


8. हत्तीवर बसून प्राणायाम करताना रामदेव बाबा पडले, हत्तीच्या हालचालीमुळे तोल गेल्याने रामदेव बाबा जमिनीवर, व्हिडीओ तुफान व्हायरल


9. बहुप्रतीक्षित आयफोन 12 आणि आयफोन 12 प्रो मॅक्स लॉन्च, सर्वात स्लीम 5G फोन असल्याचा अॅपलचा दावा


10. चेन्नई सुपर किंग्सकडून पराभवाचा वचपा, सनरायझर्स हैदराबादवर 20 धावांनी मात, केन विल्यमसनची 57 धावांची एकाकी झुंज अपयशी