मुंबई : विधानसभेत चौथ्या रांगेत बसवल्याने माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे चांगलेच नाराज झाले आहे. पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो, त्यावेळीही चौथ्या रांगेत बसलो नव्हतो. आता बसायची वेळ आली याची खंत वाटतेय, असं खडसे म्हणाले.


 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमच्या फोन कॉलप्रकरणी झालेल्या आरोपांचाही एकनाथ खडसेंनी समाचार घेतला. जिसे पुरी दुनिया ढुंढ रही है, वो मुझे क्यो ढुंढे, असं म्हणत खडसेंनी अंजली दमानियांवरही टीकास्त्र सोडलं.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांनाही खडसेंनी अप्रत्यक्ष टोला लगावला. आज जो प्रसंग माझ्यावर आला, तो तुमच्यावरही येईल.  माझ्यावर कोणत्याही जबाबदार राजकीय पक्षाने आरोप केले असते तर चाललं असतं. पण दमानिया आणि भंगाळेंनी केलेल्या आरोपांची तात्काळ दखल घेतली, असंही खडसे म्हणाले.