पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात 3.6 रिश्टरस्केल भूकंपाचे धक्के बसले आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू तालुक्यातील काही गावं तसेच गुजरात मधील उंबरगाव तालुक्यातील काही देखील गावांना सौम्य हादरे 6 वाजून 39 मिनिटांच्या दरम्यान धक्के जाणवले.

डहाणू तालुक्यातील झाई, बोर्डी, डहाणू, धाकटी डहाणू, वाणगाव, दापचरी, धुंदलवाडी, सास्वंद, बहारे, आंबेसरी, गांगणगाव, आंबोली, रानशेत, कासा, चारोटी भागात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी सौम्य धक्के जाणविल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती दिली आहे. गुजरातमधील उंबरगाव तालुक्यातील गावांनाही हादरे बसले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.



याआधीही पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी तालुक्यात धुंदलवाडी, दापचरी, बहारे भागात भूकंपाचे धक्के पुन्हा बसले होते.  या परिसरात मागील दोन महिनाभरापासून सतत भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

नोव्हेंवर महिन्यात काही ठिकाणी हादऱ्याने घड्याळं, भांडी, कपाटं खाली पडली होती तर खिडक्या, दरवाज्यांचा देखील झटक्याने आवाज झाल्याचे नागरिकांनी सांगितले होते. दोन महिन्यात ही पाचवी घटना घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.