Kolhapur News : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत दोनदिवसीय ई टेंडर फायलिंग, जेईएम पोर्टल आणि वेंडर डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये शासकीय ई टेंडर कसे भरावे, ई टेंडर कार्यपद्धती, टेंडर कसे वाचावे, टेंडरसाठी आवश्यक कागदपत्रे, शासकीय ई निविदा व सुट फायलिंग प्रोसेस, शासकीय ठेकेदार कसे बनावे तसेच डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र नोंदणी, माहिलांसाठी राखीव ई टेंडर, उपलब्ध शासकीय अनुदान याबाबत माहिती मिळेल. तसेच व्हेंडर नोंदणी, बी.ओ. क्यू प्रोसेस, जेईएम पोर्टलवर उद्योगाची नोंदणी व त्याचे फायदे, बिडिंग म्हणजे काय, ई रिव्हर्स ऑक्शन निविदा सुट नोंदणी, डीडी रिफंड व ऑनलाईन, ऑफलाईन पेमेंट इ. विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे.
कार्यशाळा उद्योजक, शेतकारी उत्पादक कंपनी, धान्य व्यापारी, बांधकाम ठेकेदार, इलेक्ट्रिक ठेकेदार मेडिकल व्यापारी, किराणा व्यापारी, महिला बचत गट, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था, सेवाभावी संस्था, मनुष्यबळ पुरवठा ठेकेदार, सॉफ्टवेअर, हार्डवेअर इंजिनिअर तसेच इतर इच्छुक व्यक्तींसाठी उपयुक्त आहे. कार्यशाळेसाठी मर्यादित प्रवेश असल्यामुळे इच्छुकांनी अधिक माहितीसाठी वनिता पाटील (प्रकल्प अधिकारी यांना 315, ई वॉर्ड न्यू शाहूपुरी, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, कोल्हापुर येथे त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिष्यवृत्ती योजनेबाबत विद्यार्थ्यांना आवाहन
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक वर्ष सन 2021-22 करीता शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन भरण्यात आले आहेत. सन 2021-22 या कालावधीची शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जमा झालेल्या रकमेतून निर्वाह भत्ता वगळता इतर रक्कम महाविद्यालयास अदा करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत 2020-21 ते 2025-26 या कालावधीकरीता मार्च 2021 पासून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मार्गदर्शक सूचनामधील निधी वितरणासंदर्भातील बाबी राज्यात लागू करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार संपूर्ण शिष्यवृत्तीची रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असणारा भाग (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नापरतावा शुल्क इ.) तसेच विद्यार्थ्यांना देय असणारा भाग (निर्वाह भत्ता) विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. तसेच जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यास अनुज्ञेय असलेला निर्वाह भत्ता वजा जाता उर्वरित महाविद्यालयास देय असलेली रक्कम विद्यार्थ्याने पुढील सात दिवसांच्या आत महाविद्यालयास जमा करणे अनिवार्य आहे.
इतर महत्वाच्या बातम्या