Pahalgam Terror Attack : सिंधू नदीतील पाणी थांबवले, तर आम्ही सिंधू नदीवरील धरण उडवून टाकू, अशी धमकी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफने (Khawaja Asif) दिली असून, या वल्गना पोकळ धमकी असून त्याला गांभीर्याने घेण्याची गरजच नाही. असे मत सिंधू नदीच्या परिसरात अनेक वर्ष लष्करी सेवा बजावणारे मेजर जनरल अनिल बाम (Retired Major General Anil Bam) यांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ (Khawaja Asif) यांना सिंधू नदीच्या भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान नाही. सिंधू नदीवरील धरण उडवने एवढे सोपे नसून पाकिस्तानची (Pakistan) ती क्षमता ही. नाही असे ही मेजर जनरल बाम म्हणाले. मुळात पाकिस्तानचे सर्व नेते सध्या संरक्षण तज्ञ बनून अण्वस्त्रांची धमकी देत आहे. मात्र त्यांना स्थानिक परिस्थितीची जाणीवच नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याच्या वक्तव्याला ही गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे ही बाम म्हणाले.
मुळात पहलगामची घटना विद्यमान पाकिस्तानी आर्मी चीफ मुनीर यांची खुर्ची वाचवण्यासाठी केलेला उपद्रव वाटतय. त्यामुळे सर्व समस्याच्या सेंटर ऑफ ग्रविटी पाकिस्तानी सैन्यच असून आता त्याला हादरा देण्याची गरज असल्याचे मेजर जनरल बाम म्हणाले. सध्या काश्मीरच्या जंगलांमध्ये लपून बसलेला हाशिम मुसा निश्चितच पकडला जाईल. जोवर त्याला स्थानिकांची मदत मिळत राहील तेवढे दिवस तो पळत राहील, नंतर त्यालाही जहन्नुमला जावं लागेल असे ही बाम म्हणाले.
स्थानिकांच्या मदतीशिवाय हल्ला होणे शक्यच नाही- अनिल बाम
स्थानिकांच्या मदतीशिवाय असा हल्ला होणे शक्यच नव्हते, आणि आता तर एनआयएने सुद्धा तिथल्या घोडेवाल्यांवरही संशय व्यक्त करत त्यांची चौकशी सुरू केली आहे. हाशिम मुसा आणि त्याला मदत करणारे स्थानिक सहकारी संपवले जातील. दरम्यान, हाशिम मुसा छोटा मोहरा असून तो आपला टारगेटच नाही. आपला टार्गेट मोठा असून लवकरच त्या संदर्भातील कारवाई केली जाईल, असा विश्वासही मेजर जनरल बाम यांनी व्यक्त केला.
तर POKमध्ये आपत्काल जाहीर करावे लागले- अनिल बाम
सध्या, पाकिस्तानची चौफेर कोंडी होत असून पीओके आणि बलुचिस्तान त्याचेच उदाहरण आहे. पीओकेमध्ये तर आपत्काल जाहीर करावे लागले आहे. तेथील स्थानिक जनता पाकिस्तानच्या विरोधात असून त्यांना पाकिस्तान सोबत राहायचे नाही आहे. बलुचिस्तान मध्ये ही पाकिस्तान विरोधी स्थिती आहे.. तिथल्या विद्रोहींनी अनेक गाव आणि शहर काबीज केली असून पाकिस्तानी सैन्य तिथून शस्त्र टाकून पळून जात आहे. यावरूनच पाकिस्तानच्या सैन्याचे मनोबल सध्या कोणत्या स्तरावर पोहोचले आहे हे आपल्या लक्षात येत असल्याचे बाम म्हणाले.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी उघडरीत्या गेले तीन दशकांपासून पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवत असल्याचे मान्य केले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व मोठे दहशतवादी त्यांच्याकडेच सापडतात. त्यामुळे पाकिस्तान दहशतवाद पसरवत आहे, हे वारंवार सिद्ध करण्याची गरजच उरलेली नाही. मुळात पहलगामची घटना विद्यमान पाकिस्तानी आर्मी चीफ मुनीर यांची खुर्ची वाचवण्यासाठी केलेला उपद्रव वाटतय. त्यामुळे सर्व समस्याच्या सेंटर ऑफ ग्रविटी पाकिस्तानी सैन्यच असून आता त्याला हादरा देण्याची गरज असल्याचे मेजर जनरल बाम म्हणाले.
हे ही वाचा
