Dussehra 2021 Live :आज दसरा, दसऱ्याचा उत्साह, राजकीय मेळावे, वाचा प्रत्येक अपडेट
Shivsena Dasara Melawa 2021 : आज दसरा. दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमध्ये पार पडणार आहे. वाचा प्रत्येक अपडेट्स...
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कामठी, नागपूरमधील ड्रॅगन पॅलेस येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
दसऱ्याचा मुहूर्त साधत नाशिकमध्ये सोने खरेदीला ग्राहकांची गर्दी. मागील दोन वर्षाचे अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजया दशमीचे मुहूर्त टळल्यानंतर आजचा मुहूर्त साधत सोने खरेदीला उधाण आलंय. येणारी लग्नसराई आणि गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोने खरेदीला प्रधान्य दिलं जातंय, पारंपरिक दागिने खरेदीकडे महिलांचा कल दिसुन यतोय. दिवसभरात शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
साडेतीन मुहूर्तांपैकी प्रमुख एक मुहूर्त म्हणून दसरा सणाच्या मुहूर्त मानला जातो हा मुहूर्त शुभ कार्यासाठी उत्तम मानला जातो. या दिवशी कोणी घर, प्लॉट,वाहने,कपडे सह विविध वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असतात. जळगावच्या सुवर्ण नगरीत मात्र या दिवशी अनेक ग्राहक हे सोने खरेदीला पसंती देत असल्याचं नेहमीच पाहायला मिळत असते. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केलेली सोने खरेदी ही शुभ गोष्ट असते अशी जळगाव जिल्ह्यात अनेकांची श्रद्धा असल्याने अनेक कुटुंब हे आपापल्या ऐपती प्रमाणे कमी अधिक प्रमाणात दसरा शुभ मुहूर्तावर सोने खरेदीचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करीत असतात.
आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जळगाव शहरातील भंगाळे गोल्ड या सोन्याच्या दुकानात ही ग्राहकांनी अशीच गर्दी केली असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील वर्षी याच दिवशी सोन्याचे दर 50 हजार होता आज तोच 48500 आहे, मागील वर्षांच्या तुलनेत ते कमी असल्याने अनेक ग्राहकांनी कमी झालेल्या सोन्याच्या दराचा फायदा घेण्यासाठी दसऱ्याचा मुहूर्त शोधला असून अनेक ग्राहकांनी सोन्याच्या बाजारपेठेत मोठी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळत आहे
दसऱ्यानिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून काढल्या जाणाऱ्या दुर्गामाता दौडीस परवानगी न दिल्याच्या विषयावरुन संभाजी भिडे सरकारवर भडकले
दसऱ्यानिमित्त साध्या पध्दतीने आयोजित केलेल्या दुर्गामाता दौडीच्या समारोप प्रसंगी बोलताना संभाजी भिडे यांची महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका
आताच्या राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी ,मेंदू विकारवश झालेत, त्यामुळे दुर्गामाता दौड करण्यास परवानगी दिली नाही
लॉकडाऊन झाल्यानंतर 21 व्या दिवशी महसूल वाढतो म्हणुन राज्यभरातील दारूची दुकाने उघडी ठेवा म्हणून सांगतात आणि दुर्गामाता दौडीस बंदी घालतात ते राज्यकर्ते बेशरम आहेत
कसली सरकारे आपल्या राज्यात आहेत? उदात्त, पवित्र अंतकरणाने राज्य करणारा राज्यकर्ता आपल्याला मिळत नाही
कोरोना म्हणजे चीनने तुम्हा-आम्हाला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे...कोरोना हा काल्पनिक, ना स्त्री ना पुरुष अशा मनोवृत्तीच्या माणसाना होणार रोग आहे..कोरोना थोतांड आहे,...
महाराष्ट्र मधील राज्यकर्त्यांच्या अंतकरणात शिवाजी-संभाजी महाराजांची वस्ती असती तर संपूर्ण देशाचे नेतृत्व करणारे राज्यकर्ते झाले असते
Shivsena Dasara Melawa 2021 : आज दसरा. दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमध्ये पार पडणार आहे. आपापल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
पार्श्वभूमी
Shivsena Dasara Melawa 2021 : आज दसरा. दसऱ्याच्या निमित्तानं शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत तर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमध्ये पार पडणार आहे. आपापल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार?
दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोरोना काळात बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित होणार आहे. पण तरीही उद्धव ठाकरेंच्या भाषणानं सैनिकांमध्ये तोच जोश पाहायला मिळतोय यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? ठाकरेंच्या तावडीत कोण सापडणार? सैनिकांना मेळाव्यात नवीन उर्जा मिळाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दसरा मेळावा शिवसैनिकांसांठी एक उर्जेचा स्रोतच जणू. बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत दसरा मेळाव्याल्या शिवसैनिक हजारोंच्या संख्येनं गर्दी करतात आणि एक नविन उर्जा घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात करतात. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला एक वेगळीच परंपरा आहे. गेली अनेक वर्ष शिवाजी पार्कच्या मैदानात ठाकरेंची तोफ धडधडायची. पण यंदा हा सोहळा षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाषण देणाऱ्या ठाकरेंना यंदा मोजक्याच लोकांसमोर भाषण करावं लागणार आहे. पण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहचण्यासाठी ॲानलाईनची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे नेते, मंत्री, आमदार विभागप्रमुख, महापौर आणि महापालिकेतले महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
आगामी महानगरपालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवत सैनिकांसाठी हा मेळावा अत्यंत महत्वाचा आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असल्यानं उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर राज्यातले आणि केंद्रातले भाजपचे नेते असतील असं म्हटलं जातंय. तसेच यातील सर्वात महत्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे केंद्रीय यंत्रणा. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय यंत्रणा राज्यातल्या विविध नेत्यावर कारवाई सुरु आहे. ईडी, सीबीआय आणि आता एनसीबीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं आहे. अशातच शिवसेना महाविकास आघाडीसोबत जरी असली तरी सावरकरांना भारतरत्न देण्याची त्यांची आजही आग्रही मागणी राहिली आहे. त्यामुळे शिवसेनेचं सावरकर प्रेम अजुनही कमी झालेलं नाही. त्यामुळं नव्यानं सावरकरामुळे सुरु झालेल्या वादावर उद्धव ठाकरे खरपूस समाचार घेतील.लखीमपूर प्रकरणात केंद्र सरकारचा चिडीचूपपणा, महाराष्ट्र बंद शेतकरीविरोधी धोरणं यावर उद्धव ठाकरे आवर्जुन बोलणार राज्यातल्या शेतकरी धोरणं जाहीर करतील. कोरोना काळात मुंबई महाराष्ट्र वगळता ॲाक्सिजन आणि लसीवरून जे राजकारण रंगलं त्यावरून उद्धव ठाकरे जाहिरपणे बऱ्याचवेळा बोलले, पण आगामी निवडणुकांच्या पाश्वर्भूमिवर राज्यात काय काय केलं? हे सांगायला ठाकरे विसरणार नाहीत. तसेच गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नावं भगतसिंग कोश्यारी मंजूर करत नाहीत. तसेच विविध धोरणात राज्यपाल आणि सरकारमध्ये एकमत नसतानाचे बरेच किस्से आहेत. त्यामुळे ठाकरे राज्यपालांचाही समाचार घ्यायला विसरणार नाहीत.
पंकजा मुंडेंच्या भाषणाचा सूर कसा असणार?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर होणार आहे. प्रशासनानं नियम आणि अटींसह या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे सांगत आहेत. या संदर्भात त्यांनी एक व्हिडीओ त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन जारी केला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपण सर्वजण कार्यक्रमासाठी उत्सुक आहोत. दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत. तुमचंही ऐकायचं आहे, मलाही बोलायचं आहे. या दोन वर्षात अनेक घटना घडल्या. या दोन वर्षात मनात अनेक गोष्टी साचल्या आहेत, अनेक संघर्ष, अनेक यश-अपयश याची सर्व कहाणी. तिथून आपण कोणती उमेद घ्यायची आणि भविष्याचा प्रवास कसा करायचा हा भाषणाचा सूर असेल. मी काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष आहे, माझंही लक्ष आहे, कारण मी जे काही बोलते ते स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने बोलते. भगवान बाबांच्या आशिर्वादाने आणि मुंडे साहेबांच्या संस्कारावर आधारीत बोलते. त्यामुळं आपण कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.पंकजा मुंडे म्हणाल्या की, इथून आतापर्यंत आपण अनेक संकल्प केले आहेत. मुंडे साहेबांनी अनेक संकल्प केले होते, आपण ते तडीसही नेले. असेच संकल्प करण्यासाठी आपण दरवर्षी तिथं येतो. ती एक उर्जा आहे, एक शक्ति आहे, आपला अभिमान आहे. आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहाल अशी अपेक्षा आहे. आपण घरातून निघताना आपली शिदोरी घेऊन निघा. पाणी सोबत ठेवा. कार्यक्रमस्थळी आपल्या गाड्या व्यवस्थित पार्क करा. कोरोनाचं संकट टळलं असलं तरी आपण काळजी घ्यायची आहे. आपण मास्क लावूनच यायचं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्यामुळं कुणाला होऊ नये याची काळजी घ्यावी.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -