नागपूर : नागपूर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने बनावट कॉस्मेटिक्सचा मोठा कारोबार उघडकीस आणला आहे. लॉरियल, सनसिल्क, हिमालया, डव्ह, हेड एन्ड शोल्डर, पेन्टिन अशा नामांकित ब्रॅण्ड्सचे बनावट कॉस्मेटिक्स कारखान्यात बनवले जायचे. सलून, ब्युटी पार्लर आणि झोपडपट्ट्यांमध्ये हे बनावट कॉसमेटिक्स खपवले जात होते.
नागपुरातील बजेरिया परिसरात पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तरित्या कारवाई करत नकली कॉसमेटिक्सचा मोठा कारोबार उघडकीस आणला. बाजेरिया परिसरात एका इमारतीत चौथ्या माळ्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून आग्रामधील चौघे जण हा कारखाना चालवत होते.
नामांकित कंपन्यांच्या कॉसमेटिक्सच्या रिकाम्या बॉटल जमा करुन त्यामध्ये केमिकल्सच्या मदतीने बनविलेले कॉसमेटिक्स भरुन त्यांची बाजारात विक्री केली जात होती.
प्रामुख्याने सलून, ब्युटी पार्लर आणि झोपडपट्ट्यांमध्ये हे नकली कॉसमेटिक्स खपवले जात होते. नामांकित कंपन्यांच्या जे असली कॉस्मेटिक्सचे बाजार भाव 200 ते 300 रुपये आहेत. तेच बनावट कॉसमेटिक्स अवघ्या 30 ते 40 रुपयात विकले जात होते.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते या बनावट कॉसमेटिक्समध्ये अत्यंत हानिकारक केमिकल्स स्थानिक बाजारातून खरेदी करुन ते बॉटलमध्ये टाकून ग्राहकांच्या माथी मारले जात होते. त्यामुळे एका प्रकारे ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ या कारखान्याच्या माध्यमातून सुरु होते.
नागपुरात बनावट कॉस्मेटिक्सच्या रॅकेटचा पर्दाफाश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Nov 2017 08:05 PM (IST)
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते या बनावट कॉसमेटिक्समध्ये अत्यंत हानिकारक केमिकल्स स्थानिक बाजारातून खरेदी करुन ते बॉटलमध्ये टाकून ग्राहकांच्या माथी मारले जात होते. त्यामुळे एका प्रकारे ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ या कारखान्याच्या माध्यमातून सुरु होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -