Prakash Amte : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे (Dr. Prakash Amte) यांच्या तब्येतीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  डॉ.प्रकाश आमटे यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड कॅन्सरचे निदान  (Lukemia Blood Cancer)  झाले आहे. त्यासाठी पुढील तपासण्या सुरू असल्याची माहिती मुलगा अनिकेत आमटे (Aniket Amte)  यांनी फेसबुक पोस्टच्या (Facebook Post)  माध्यमातून दिली आहे.


 हेमलकसाच्या(Hemalkasa)  जंगलात आदिवासी आणि वन्यप्राण्यांच्या सेवेत रमलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी  आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे.  प्रकाश आमटे पुण्यातीस बीजे मेडिकल कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभाला आले असता त्यांना जास्त ताप व खोकल्याचा त्रास झाला म्हणून एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. सध्या त्यांनी उपचाराला थोडा प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या पुढील तपासण्या सुरू  आहेत. 


 



आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तून अनेक वर्षे करत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी डॉ. मंदाताई देखील सामील झाल्या. आमटे कुटुंबियांची चौथी पीढी या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत. 1973साली सुरू झालेल्या प्राण्यांच्या अनाथालयाला 1991 मध्ये रेस्क्यू सेंटरची मान्यता मिळाली. जंगली प्राणी आणि माणूस यांच्यात वेगळं नातं जपणारं ठिकाण म्हणून हे 'आमटे आर्क' प्रसिद्ध आहे


 ‌सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ (Ramon Magsaysay) हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात आला आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते.