Dr. Pradip Kurulkar Spy Case : भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याप्रकरणी DRDO च्या डॉ. प्रदीप कुरुलकरांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रदीप कुरुलकरांच्या एटीएस कोठडीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्यांना आज न्य़ायालयात हजर करण्यात आलं होतं. ते DRDO मध्ये असताना चार ते पाच मोबाईल वापरत होते. या संस्थेच अॅन्ड्रॉईड फोन वापरण्यास बंदी आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यावर त्यांना आता न्यायालयीन कोठही सुनावण्यात आली आहे.


DRDO संस्थेत अॅन्ड्रॉईड मोबाईव वापरण्यास बंदी आहे. त्यात जर संचालकपदी असलेलेच व्यक्ती मोबाईल वापर असेल तर ही गंभीर बाब आहे. वापरत असलेल्या मोबाईलची संपूर्ण माहिती कार्यालयाकडे द्यावी लागते. मात्र तरीही ते चार ते पाच फोन वापरत असल्याचं तपासात समोर आलं आहे. चार फोन अनलॉक झाले होते. मात्र त्यातील एक फोन अनलॉक होत नव्हता. काल स्वत: कुरुलकर यांनी फोन अनलॉक करुन दिला. या फोनमध्ये महत्वाची माहिती तापासात सापडली. आता या माहितीच्या आधारे यापुढील तपास करण्यात येणार आहे. कुरुलकरांचा एटीएसचा तपास पूर्ण झाला असल्याने आता त्यांना येरवड्याच्या कारागृहात पाठवण्यात येणार आहे. 


प्रदीप कुरुलकरवर नेमका आरोप काय?


डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हनीट्रॅपच जाळं टाकलं होतं. त्यासाठी लंडनमधील मोबाईल नंबरचा उपयोग करून प्रदीप कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीच नावं झारा दास गुप्ता असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचं सांगितलं. पुढे या दोघांमधला संवाद अतिशय खाजगी पातळीवर पोहचला. या संवादादरम्यान डॉ. प्रदीप कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या ब्राम्होस आणि इतर क्षेपणास्त्रांची डिझाइन्स मागण्यात आली. त्याचबरोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती. कुरुलकर ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.