Mahaparinirvan Din LIVE : आज महापरिनिर्वाण दिन, पाहा प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din News Updates : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.
चैत्यभूमीवर गोंधळ, अनुयायी परस्परांत भिडले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनासाठी आत प्रवेश दिला जात नसल्याच्या कारणानं गोंधळ
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुण्यातील सिम्बॉयसिसमधील शिक्षण संस्थेत आयोजित अभिवादन कार्यक्रमाला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित.
बोधीसत्व, भारतरत्न, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व भीम अनुयायांच्या वतीने कँडल मार्च काढून अभिवादन केले वाशिम च्या स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.
NCB अधिकारी समीर वानखेडे चैत्यभूमीवर दाखल, डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी वानखेडे चैत्यभूमीवर
उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यपाल भगतसिंह कोशियारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महापौर किशोरी पेडणेकर मंचावर दाखल झाले आहेत
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून ऐरोली येथे उभारलेल्या डाॅ बाबासाहेब आंबेडकर भवनातील सुविधांचे उद्घाटन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या भवनात आत्याधुनिक लायब्ररी , संपुर्ण जीवनप्रवासाच्या क्षणचित्रांचा संग्रह उभारण्यात आला आहे. नवी मुंबई महानगर पालिकेकडून 54 कोटी रूपये खर्च करून भव्य असे डाॅ बाबासाहेब आंबेडकर भवन तयार केले आहे. 2017 रोजी भवनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते. सध्या या भवनात लायब्ररी तयार करण्यात आली असून यामध्ये 5 हजार पर्यंत पुस्तकांचा संग्रह ठेवण्यात आला आहे. आंबेडकर यांच्या चरित्रावरील सर्व पुस्तके, इतर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इथे इलेक्ट्रीक , ॲाडियो लायब्ररीचा सहभाग आहे.
आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीकडून भीमांजली या कार्यक्रमाचं आयोजन रवींद्र नाट्य मंदिर मध्ये करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाबत प्रसिद्ध वायलीन वादक उस्ताद फैय्याज खान, तबला वादक पंडित मुकेश जाधव इत्यादी कलाकारांनी आपल्या वादनातून अनोखी आदरांजली वाहिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी परिसरात देशभरातुन अनुयायी येत असतात परंतु मागच्या दोन वर्षात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता मुंबई महापालिककेकडून यंदा देखील अनुयायांनी चैत्यभूमी परिसरात येऊ नये घरूनच अभिवादन करावं असं आव्हान महापालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे. यासोबतच महापालिकेकडून ओपीडी देखील सुरू करण्यात आली आहे
चैत्यभूमी परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री अस्लम शेख, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार राहुल शेवाळे पोहोचले आहेत
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानसूर्य, महामानव, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारांचे स्मरण करून त्यांच्या स्मृतीस कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला एकता, समता, बंधुता, सर्वधर्मसमभावाचा विचारच देशाला, समाजाला पुढे घेऊन जाणार आहे. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांमध्ये मानवकल्याणाची ताकद असून या विचारांवर चालण्याचा आपण सर्वांनी पुनर्निर्धार करुया, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, डॉ. बाबासाहेबांनी आपल्याला ‘शिका आणि संघटीत व्हा’ अशी शिकवण दिली. समाजातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान, न्याय, व्यक्ती-अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा हक्क व समानतेची वागणूक देणारी राज्यघटना दिली. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, भौगोलिक विविधता असलेल्या आपल्या देशाला एकसंध, एकजूट, सार्वभौम ठेवण्याचं श्रेय भारतीय राज्यघटनेला आणि बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेली राज्यघटना व राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य असून त्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प होऊया, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सशक्त प्रजासत्ताक राष्ट्र उभारणीसाठीचे अमूल्य योगदान कारणीभूत आहे, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
अभिवादन संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मानव कल्याण हाच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनध्यास होता. त्यासाठीच त्यांनी ज्ञानसाधना केली. समाजात समता, बंधुता आणि लोकशाहीची मुल्ये रुजावीत यासाठी आपल्या विद्वत्तेचा विनियोग केला. आज आपण स्वातंत्र्याचे अमृत क्षण अनुभवत आहोत. त्यामागे डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेच्या निर्मितीत दिलेले अमूल्य योगदान हे एक कारण आहे. यातून एक सशक्त असे प्रजासत्ताक राष्ट्र उभे राहू शकले. डॉ. आंबेडकर यांच्या या योगदानासाठी आपण सर्व कृतज्ञ राहूया आणि त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी कटीबद्ध होऊया. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन!
कोरोना प्रकोप आणि संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे. गर्दी टाळावी, आरोग्य नियमांचे पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी केले आहे.
पार्श्वभूमी
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din News Updates : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच कोरोना बाबतचे नियम पाळले जावेत म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोव्हिडचे संकट असल्याने प्रशासनाने गर्दी न कोव्हिड बाबत सुरक्षेचे उपाय योजना करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील शेकडो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 उपनगरीय विशेष गाड्या
आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 उपनगरीय विशेष गाड्या (Mumbai Local) चालवण्यात येणार आहेत. आज मध्य रेल्वे, मुंबई विभाग मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विभाग आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल या दोन्ही उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक होणार नाही, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्या
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे. कोरोनासंबंधित नियमांचं पालन करुन चैत्यभूमीवर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता 8 उपनगरीय विशेष गाड्या (Mumbai Local) चालवण्यात येणार आहेत. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
विशेष लोकलचं वेळापत्रक असं असेल
मेन लाईन - अप विशेष:
• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष कल्याण येथून 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.
• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.45 वाजता पोहोचेल.
मेन लाईन - डाउन विशेष:
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.00 वाजता पोहोचेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 4 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन - अप विशेष:
• पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.
• पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.50 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन - डाउन विशेष:
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 3.00 वाजता पोहोचेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4.00 वाजता पोहोचेल.
प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि उतरताना कोविड-19 नियमांचे पालन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. तसेच गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -