Dombivali Crime News : बदलत्या जीवनशैलीमुळे गरजांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशामध्ये अगदी बालपणीपासूनच काहीजण नकोत्या गोष्टींसाठी नको त्या मार्गाला वळत असल्याचं समोर येत आहे. अशाचप्रकारे चूकीच्या मार्गाला लागलेल्या दोन अल्पवयीन मुलांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी (Dombivali Ramnagar Police)O चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केलं आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 22 महागडे मोबाईल आणि दहा सायकल हस्तगत केल्या आहेत. दोघेही शहरात फिरायचे, संधी साधत लोकांच्या घराबाहेर उभी असलेली सायकल तसेच घराच्या खिडकीत ठेवलेले मोबाईल घेऊन पसार व्हायचे, असे समोर आले असून पोलीस या संपूर्ण प्रकरणी पुढील तपास करत आहेत.


मागील काही महिन्यांमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये (Kalyan Dombivali) घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल चोरी असे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या आणि अशाचप्रकारच्या विविध गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय शिंदे, उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त उमेश माने पाटील आणि सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत . ही पथके रात्रंदिवस चोरट्यांचा मागावर असून त्यांनी आतालपर्यंत अनेक गुन्हे उघड केले आहेत. असा एक गुन्हा डोंबिवलीतील रामनगर आता पोलिसांनी उघडीस आणला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी योगेश सानप, पोलिस कर्मचारी विशाल वाघ, शंकर निवडे, प्रशांत सरनाईक आणि नितीन सांगळे यांच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. 


दोघेही लहान मुलांच्या सायकल घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांनी उडवा उडविची उत्तरे दिल्याने पोलिसाना संशय आला त्यांनी अधिक चौकशी केली असता त्यांची सायकल आणि त्यांच्याजवळील मोबाईल चोरीचा असल्याचे उघड झाले .पुढील तपासादरम्यान हे दोघे मोबाईल आणि सायकल चोरी करीत असल्याचे उघड झाले असून त्यांच्याकडून पोलिसांनी २२ महागडे मोबाईल आणि 10 सायकल जप्त केल्या आहेत. मौज मस्तीसाठी हे दोघे चोरी करीत असल्याचे तपसात उघड झाली आहे.


हे ही वाचा -