मुंबई : एकीकडे राज्य सरकार लसीकरण वाढविण्यासंदर्भात पाठपुरावा करत आहे तर दुसरीकडे जेलमधील परदेशी कैद्यांना ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना लस देण्यात अडचणी समोर उद्भवत आहेत. परदेशी कैद्यांकडे फक्त पासपोर्ट आहे आणि लस देण्यासाठी आधार कार्ड असंण गरजेच आहे तर काही भारतीय कैद्यांकडे आधार कार्डच नाही. त्यामुळे अशा कैद्यांना सुद्धा लस देण्याची मागणी जेल प्रशासनाने सरकारकडे केली आहे.


सर्वांना लस मिळावी हा मुख्य उद्देश सरकारचा आहे मात्र यामध्ये जेलमधील परदेशी आणि काही भारतीय कैद्यांना लस कशी द्यायची असा सवाल जेल प्रशासनासमोर येऊन उभा राहिला आहे. त्याच कारण ही तसंच आहे लस देण्यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे आहे मात्र ज्यांच्याकडे आधार कार्डच नाही त्या कैद्यांना लस द्यायची कशी ? 


जेलमध्ये लस देण्यात नेमक्या कुठल्या अडचणी?



  • नॅशनल क्राईम ब्युरो डिसेंबर 2019 च्या रेकॉर्ड नुसार, महाराष्ट्रातील जेलमध्ये 517 परदेशी कैदी आहेत.

  • यामध्ये 51 कैद्यांना शिक्षा भोगत आहेत तर 466 कैद्यांवरचे खटले अजून सुरू आहेत.

  • अर्थररोड,भायखळा महिला कारागृह ठाणे, तळोजा, कल्याण आधारवाडी, येरवडा जेलमध्ये 250 पेक्षा अधिक परदेशी कैदी आहेत

  • यामधील बहुतांश कैदी हे श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, नायजेरिया,आणि इतर आफ्रिकी देशांमधील आहेत.

  • परदेशी नागरिकांना जेव्हा अटक केली तेव्हा त्यांच्याकडे फक्त त्यांचा पासपोर्ट सापडला जे कोर्टामध्ये नंतर जमा करण्यात आले. तर काही भारतीय कैद्यांकडे सुद्धा आधार कार्ड नाही आहे.


यावर कुठला तरी पर्यायी मार्ग काढण्याची विनंती जेल प्रशासनाने सरकारकडे केली आहे. ज्यामुळे सगळ्यांना लस देणे सोपे होईल. कारण जर यांना लस दिली नाही तर या मैदानावरचा धोका टळू शकणार नाही. त्यामुळे सरकार यासंदर्भात काय निर्णय घेत आहे ते पाहण महत्त्वाच असणार आहे.