दोन हजार रुपयांसाठी कोल्हापूरमध्ये डॉक्टरचा खून
एबीपी माझा वेब टीम | 02 Nov 2016 08:42 PM (IST)
कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये अवघ्या दोन हजारांसाठी एका डॉक्टरचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी पाट पन्हाळा इथं डॉक्टर देऊलकरचा खून करण्यात आला होता. डॉक्टर सतीश देऊलकर याने मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी लावतो म्हणून दोघाजणांकडून दोन हजार रुपये घेतले होते. पण आपली फसवणूक झाल्याच्या रागापोटी आरोप उत्तम देसाई आणि तानाजी थोरात या दोघांनी 59 वर्षीय डॉ. देऊलकरचा खून केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बुधवारी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.