Anil Ghanwat : चीनमध्ये कोरोनाचा (Corona) धोका वाढल्याच्या बातम्या समोर येत आहे. त्यामुळं भारतातही पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार का? पुन्हा लॉकडाऊन (lockdown) होणार का? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारनं पुन्हा लॉकडाऊन घोषित करू नये. तसे केल्यास स्वतंत्र भारत पार्टी (Swatantra Bharat Paksh) लॉकडाऊन न पाळण्याचे आंदोलन जाहीर करेल असा इशारा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट (Anil Ghanwat) यांनी दिला आहे. लॉकडाऊनमुळं आरोग्याला आणि अर्थव्यवस्थेला फायदा  होण्याऐवजी नुकसानच जास्त होत असल्याचं घनवटांनी म्हटलं आहे.

  
कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरीयंट जगभर झपाट्यानं पसरत आहे. मोठ्या संख्येनं लोक मृत्युमुखी पडत असल्याचा खोटा प्रसार माध्यमात जोर धरत असल्याचे घनवट म्हणाले. खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती आणि लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडियन मेडिकल असोसीएशनने सावधानतेचा उपाय म्हणून, सार्वजनिक जागेत मास्क वापरण्याची सक्ती, सोशल डिस्टन्सिंग, सर्व प्रकारचे सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम, लग्न, सार्वजनिक मेळावे घेण्याचं टाळण्याच्या मारदर्शक सूचना राज्यांना दिल्या आहेत. सर्वच विमान प्रवाशांना लसीकरण सक्तीचे केले आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी तसेच लक्षणे आढळल्यास विलगिकरणात ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. याची पुढील पातळी म्हणजे लॉकडाऊन असल्याचे घनवट म्हणाले.


पुन्हा लॉकडाऊन लावल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट येणार


मागील लॉकडाऊनमध्ये देशाचं मोठं नुकसान झाले आहे. जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला. कामगारांना हजारो किलोमीटर पायी चालत जावं लागलं. व्यापार, कारखानदारी ठप्प झाली होती. अनेकजण कर्जत बुडाले होते. कोविड नियंत्रण यंत्रणेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचेही नंतर उघड झाल्याचे अनिल घनवट म्हणाले. आता कुठे उद्योग व्यवसाय सुरळीत होऊ पाहत आहेत. अशात पुन्हा लॉकडाऊन लावल्यास जनतेचे प्रचंड हाल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट येणार असल्याचे अनिल घनवट म्हणाले. 


लॉकडाऊनला स्वतंत्र भारत पार्टी विरोध करणार


ज्या देशांमध्ये कडक लॉकडाऊन पाळले गेले तिथे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे ऑक्सफोर्ड विद्यापीठानं केलेल्या अभ्यासात हे निष्पन्न झाल्याचे अनिल घनवट म्हणाले. अर्थव्यस्थेवर अनिष्ट परिणाम झाले आहेत. लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ज्या देशांनी लॉकडाऊन पाळला नाही त्यातील स्वीडनमध्ये कोविड काळात मृत्यूदर, इतर देशांपेक्षा कमी असल्याचे घनवट म्हणाले. स्वतंत्र भारत पार्टीने पहिल्यापासूनच सक्तीच्या लॉकडाऊनला विरोध केला आहे. सरकारने जर पुन्हा नुकसानकारक लॉकडाऊनची घोषणा केली तर स्वतंत्र भारत पार्टी त्याला जाहीर विरोध करेल. स्वतःची काळजी घेत सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे जनतेला आवाहन करणार आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


China Corona : चीन पुन्हा कोरोना रुग्णांचा आकडा लपवतोय, कोविड आकडेवारी जारी न करण्याचा निर्णय