दूध भाववाढीच्या धमक्या देऊ नये, रामदास कदमांचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 07 Dec 2018 01:11 PM (IST)
खाजगी दूध विक्रेत्यांना सरकारने योजना दिली आहे. अर्धा लिटर दुधावर 50 पैसै, एक लिटर वर 1 रुपया डिपाॅजीट घेतले पाहिजे, असा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय आपल्या भावी पिढीसाठी आहे, असेही कदम म्हणाले.
मुंबई : दूध भाववाढीच्या धमक्या देऊ नये, अशा इशाऱ्यांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. प्लास्टिक बंदीबाबत योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात दूध उत्पादक आंदोलन करतील, असा इशारा खासगी दूध उत्पादकांनी दिल्यांनतर कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कदम यावेळी म्हणाले की, खाजगी दूध विक्रेत्यांना सरकारने योजना दिली आहे. अर्धा लिटर दुधावर 50 पैसै, एक लिटर वर 1 रुपया डिपाॅजीट घेतले पाहिजे, असा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय आपल्या भावी पिढीसाठी आहे, असेही कदम म्हणाले. दुधभाव वाढ होणार नाही, मी येत्या मंगळवारी दूध उत्पादकांची बैठक बोलावली आहे, असे कदम यांनी यावेळी सांगितले.