पुणे : राज्य कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचं 14 फेब्रुवारी रोजी (गुरुवारी) पुण्यातील बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलमध्ये वितरण करण्यात आलं. कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शेतकरी आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


यावेळी 112 शेतकऱ्यांसह संलग्न क्षेत्रातील व्यक्तीना गौरविण्यात आले. 2015 आणि 2016 मधील पुरस्कार्थी शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. कृषी विभागातील सन्मानाचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार राज्यापाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते चंद्रशेखर भडसावले आणि शिवनाथ बोरसे यांना देण्यात आलं. महिलांनाही जिजामाता कृषीभूषण पुरस्कारांने सन्मानीत करण्यात आलं.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यापाल सी. विद्यासागर राव, कृषीमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासह विविध खात्याचे मंत्री उपस्थित होते.

पुरस्कारप्राप्त व्यक्तींची नावं

डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार - 2015
1-चंद्रशेखर भडसावळे (सगुना बाग, मालेगाव, ता. कर्जत,जि. रायगड.)

वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार-2015
1- रामचंद्र सावे, पालघर
2- प्रकाश पाटील, धुळे
3- मोतीराम गावीत, नाशिक
4- राजेंद्र गायकवाड, सातारा
5- उद्धव खेडेकर, जालना
6- त्रिंबक फंड, उस्मानाबाद
7-रविंद्र गोल्डे, जालना
8- अरुण धुळे, बुलढाणा
9-सय्यद हाशम, अकोला
10- यादव दसरुजी, भंडारा

जिजामाता कृषीभूषण पुरस्कार- 2015
1- सुलोचना पिंगट, पुणे
2- मंदाताई पाटील, अहमदनगर
3-आनंदी चौगले, कोल्हापूर
4- सुवर्णा निकम, सांगली

डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार -2016
1- शिवनाथ बोरसे, मु.पो. भोयेगाव, ता. चांदवड, जि. नाशिक

वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार-2016
1-दिलीप देशमुख, ठाणे
2- वामन भोये, नाशिक
3- अरुण पवार, नाशिक
4- मकरंद सरगर, सोलापूर
5- पांडूरंग ईनामे, औरंगाबाद
6- अनिल चेळकर, लातूर
7- नंदा चिमोटे, अमरावती
8- अरविंद बेंडे, यवतमाळ
9- प्रविण बोबडे, अमरावती

जिजामाता कृषीभूषण पुरस्कार- 2016
1- प्रभावती घोगरे, अहमदनगर
2- कविता जाधव (बिडवे), अहमदनगर
3-सुनंदा क्षिरसागर, औरंगाबाद