मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीवरून 2 गटात राडा झालाय. उक्कडगावच्या सरपंच राणीबाई कातोरे यांना मारहाण करण्यात आली. तर दुसऱ्या गटातील महिलेला देखील मारहाण करण्यात आलीय. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात तब्बल 20 जणांवर परस्परविरोधी 2 विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


शांतताप्रिय असणाऱ्या गावांमध्ये उक्कडगावची ओळख आहे. मात्र 8 सप्टेंबर रोजी गावात तंटामुक्तीच्या अध्यक्ष निवडीसाठी घेण्यात आलेली ग्रामसभा ही शांतता भंग करणारी झाली. ग्रामसभेत अध्यक्ष निवडीवर एकमत न झाल्याने 2 गटात राडा झाला. महिला सरपंच असलेल्या राणी कातोरे यांनी धक्काबुक्की होऊन मारहाण करण्यात आली. यावेळी समोर असलेल्या दुसऱ्या गटातील महिलेला देखील मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटाने बेलवंडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या संपूर्ण प्रकरणात 20 आरोपी झाले असून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेलवंडी पोलीस ठाण्यात 2 विनयभंगाचे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांचे राजकीय हेवेदावे उफाळून आले आणि गोंधळ झाला. दोन्ही गटांना अध्यक्ष हा त्यांचाच हवा होता आणि याच वादामुळे 2 महिलांना मारहाण झाली. बेलवंडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले असून पोलिस तपास करत आहेत.






उक्कडगावच्या एका महिला सरपंचाला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण आणि अत्यंत खालच्या पातळीच्या शिव्या दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. मी स्वतः नगर पोलीस आयुक्तांशी बोलले आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हावी आणि या गुंडशाहीचा धुडगूस थांबवावा, असं ट्वीट राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.


तंटामुक्त गाव समितीची जबाबदारी


ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती महत्त्वाची भूमिका निभावते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना वादापासून मुक्त करण्यासाठी राबवले गेले. याद्वारे गावपातळीवरील गुन्हेगारी संपुष्टात यावी हा यामागे हेतू होता. राज्य सरकारने 15 ऑगस्ट 2007 साली या योजनेची सुरुवात केली. मात्र दिवंगत आर आर पाटील ग्रामविकास मंत्री असताना या योजनेला खऱ्या अर्थाने न्याय दिला