Maharashtra Politicis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेचं चिन्ह आणि पक्षाचा वाद याबाबतची सुनावणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटीश्वर सिंग यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने अजित पवारांना घड्याळ आणि पक्ष देण्याचा निकाल दिला आहे. त्याला शरद पवारांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना चिन्ह आणि पक्ष देण्याच्या आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.
काय आहे प्रकरण?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबद निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
अजित पवार गटाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने याचिका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने याचिका दाखल केली आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं आहे. त्यानंतर या प्रकरणी सुनावणी झालेली नाही. ही सुनावणी आज होत असल्याने सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस आणि NCP शरदचंद्र पवार पक्ष हे नाव कायम ठेवण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरत असल्याचा युक्तिवाद शरद पवार यांच्या वकिलांनी केला गेला होता.
6 फेब्रुवारी 2024 ला निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून मान्यता दिली होती. या विरोधात शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे. तर शरद पवार यांना 22 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं होतं. NCP शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. अजित पवार यांना दिलेलं चिन्ह आणि पक्ष हा निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य आहे असं शरद पवार यांच्या गटाचं म्हणणं आहे
महत्वाच्या बातम्या: