Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाच्या कबरीच्या (Aurangzeb Tomb) मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तांनी याबाबतची माहिती दिली आहे. संपूर्ण छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीत पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. शहर हद्दीत निदर्शने, धरणे, मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू केले आहेत. 

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाकण्याचा इशारा

छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. तसंच १७ मार्च रोजी औरंगजेबाची कबर उखडण्याच्या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगलही उसळली होती. त्यानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवण्यात आली आहे. नागपूरसह मराठवाड्यातही तणाव निर्माण होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे एनआयए दिल्लीचे एक पथक  छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाले होते. परभणी, जालना, नांदेड या ठिकाणीदेखील पथक गेले असून तेथील संशयित हालचालींवर लक्ष आहे. या प्रकरणात एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याची माहिती आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हलवली नाही तर बाबरीची पुनरावृत्ती करु, असा इशारा दिला आहे. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. 

दोन गटात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनं नागपूर हादरलं

दरम्यान, नागपुरात सोमवारी दोन गटात उफाळून आलेल्या हिंसाचाराच्या घटनेने राज्याची उपराजधानी हादरली आहे.  या घटनेत दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक झाल्याने या जमावाला आवरताना पोलीस आणि नागरिक ही जखमी झाले आहेत. नागपूर हिंसाचार प्रकरणात (Nagpur violence) सायबर पोलिसांनी (Police) मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खान याच्यासह सहा जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नागपूर पोलिसांचे वेगवेगळे पथक तपासाच्या वेगवेगळ्या दिशेने काम करत आहेत. आतापर्यंत 90 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या नागपूरमध्ये तणाव पूर्ण शांततेचे वातावरण आहे. नागपूरमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी नमाजानिमित्त शहरात पोलीस अलर्ट मोडवर आहेत. नागपुरात मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. नागपुरात चौकाचौकात पोलिसांचा जागता पहारा पाहायला मिळत आहे. शहरात पुन्हा तणाव टाळण्यासाठी नागपूर पोलीस डोळ्यात तेल ओतून उभे आहेत.

महत्वाच्या बातम्या:

औरंगजेबाची कबर हटवा, ती राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येत बसत नाही, हायकोर्टात याचिका दाखल