Ujani and Veer Dam : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. या पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उजनी धरण (Ujani Dam) ओव्हरफ्लो झालं आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील वीर धरण (Veer Dam) देखील पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. सध्या या धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु आहे. त्यामुळं धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून 70 हजार क्यूसेकने तर वीर धरणातून 15 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. उजनी आणि वीर ही धरणे देखील ओव्हरफ्लो झाली आहेत. या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. उजनी धरणातून 70 हजार क्यूसेक तर वीर धरणातून 15 हजार क्यूसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आला आहे. त्यामुळं भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच वीर धरमातून नीरा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
दरम्यान, उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळं पंढरपुराती चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली आहे. यातच विठ्ठल दर्शनापूर्वी चंद्रभागेच्या स्नानाला आलेल्या भाविकांना पाण्यात न उतरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामुळे चंद्रभागेत पाय धुवून आणि पात्रात नौकानयन करून भाविक आनंद घेत आहेत. सध्या धरणात येणारा पाण्याचा विसर्ग पाहता नदीतील पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वीर धरणातील नीरा नदीत सोडलेले पाणी संगम येथे भीमा नदीत मिसळत असल्याने या दोन्ही धरणांचे पाणी थेट पंढरपूरमध्ये येत असते. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातच पंढरपूरकरांवर पुराचा धोका संभवण्याची शक्यता आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबईत (Mumbai) देखील जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Mumbai Rain : सावधान! पुढील तीन ते चार तास मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
- Maharashtra Rain : मुंबईसह पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, आजही राज्यात पावसाचा अंदाज