मुंबई: आता राज्यातील शासनाच्या तसेच खाजगी जमिनीवर खोदकाम करण्यापूर्वी CBuD या प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणतेही खोदकाम करताना नोंदणी करून परवानगी घेतली नाही तर आता दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी करताना मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते. या उत्खननामुळे त्याठिकाणी आधीच अस्तित्त्वात असलेल्या इतर पायाभूत सुविधांना (उदा. रस्ते , पाण्याचे नळ , मलनिस्सारण वाहिन्या, दूरसंचार पायाभूत सुविधा, विद्युत वाहिन्या, गॅस वाहिन्या , ऑप्टीकल फायबर केबल्स् , इत्यादी) हानी पोहोचते . त्यामुळे मालमत्ता आणि सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. तसेच सेवांचा पुरवठा खंडीत होऊन नागरिकांची गैरसोय होते.
त्यामुळे उत्खनन करणाऱ्या विविध संस्थामध्ये ताळमेळ ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने Call Before u big (CBUD) या प्रणालीची निर्मिती केली आहे. या प्रणालीद्वारे उत्खनन संस्था आणि पायाभूत सुविधा मालमत्ता मालक विभाग यांच्यात समन्वय घडवून आणण्यात येणार आहे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.
खोदकाम करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांना खोदकाम करण्याच्या कार्यवाहीसाठी Call Before u big (CBUD) या सामाईक प्रणालीवर नोंदणी करणे शासनाने आता बंधनकारक केलेले आहे.
Call Before UDig (National Broadband Mission DoT) या प्रणालीवर त्यांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात येत आहे . ही प्रणाली ( App) अॅन्ड्रॉईडमध्ये उपलब्ध असलेल्या Play Store आणि IOS Mobile मध्ये उपलब्ध असलेल्या App Store मधून Download करता येईल. खोदकाम करताना नोंदणी करत परवानगी घेतली गेली नाही तर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा :