धुळे : एसटीची भाडेवाढ जाहीर झाली खरी, मात्र प्रवाशांना ज्या मशीनच्या माध्यमातून तिकीट देण्यात येतं ती मशीन अपडेट झाली आहे का? ज्या ठेकेदाराला या तिकीट मशीनचा ठेका दिलाय, त्याची यंत्रणा किती प्रभावी काम करतेय, याचा आढावा एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाने घेतला आहे का? हे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत.
प्रवाशांना देण्यात येणारं तिकीट नवीन भाडे आकारणीनुसार मशीनमधून प्रिंट होऊन निघण्यासाठी तसा अपडेट प्रोग्राम किती ठिकाणी अपडेट करण्यात आलाय?
एसटी प्रशासनाच्या मतानुसार, वाहक आणि प्रवाशी यांच्यात सुट्टे पैसे वरुन होणारे वाद टाळण्यासाठी नवीन भाडे आकारणीत (राऊंड फिगर) म्हणजे पूर्णांकात होणार, असं असताना तिकीट मशीनमध्ये त्या पद्धतीने अपडेशन केलंय का? हा देखील संशोधनाचा भाग आहे. अर्थात ज्या खासगी कंपनीला या तिकीट मशीनचा ठेका दिलाय, त्या कंपनीच्या कारभाराचा अनुभव वाहकांना मनस्ताप देणारा असाच आहे.
मशीन बंद पडणे, प्रिंट न निघणे, या तर नित्याच्याच गोष्टी आहेत. याविषयी झालेल्या तक्रारींबाबत संबंधित तिकीट मशीन एजन्सीवर काय कारवाई झाली. जुन्याच दराने तिकीट निघाल्यास त्याला जबाबदार कोण? अशा वेळी कोणावर करवाई होणार? या प्रश्नांची उत्तरं एसटीचं मध्यवर्ती कार्यालय देईल का? असा सूर सध्या एसटी कर्मचाऱ्यातून व्यक्त होतोय.
एसटीची भाडेवाढ झाली, मात्र तिकीट मशीन अपडेट झाल्यात का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jun 2018 08:24 PM (IST)
प्रवाशांना देण्यात येणारं तिकीट नवीन भाडे आकारणीनुसार मशीनमधून प्रिंट होऊन निघण्यासाठी तसा अपडेट प्रोग्राम किती ठिकाणी अपडेट करण्यात आलाय?
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -