मुंबई : मान्सून (Monsoon) महाराष्ट्रात दाखल झाल्याचा सर्वांनाच आनंद झाला. बळीराजाने (Farmers) मान्सूनच्या आगमनानंतर काही जिल्ह्यात लगेचच पेरणीलाही सुरुवात केल्याचं दिसून आलं. जुनच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र कोळलेल्या वरुणराजाने आता महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे. गेल्या आठवडाभरापासून मान्सून विदर्भात रेंगाळलेला आहे. आतापर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची (Rain) आकडेवारी काढली तर 14 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. दुसरीकडे दुष्काळी भागातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होत आहे. तर, विदर्भातील अनेक जिल्ह्यांत आजही पावसाची प्रतीक्षा आहे.

यंदा पाऊसकाळ चांगला असल्याचा अंदाज हवामान खात्याने दर्शवला आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे महाराष्ट्रात दाखल झाले. पण, मोठ्या प्रमाणावर पाऊस घेऊन अद्याप आले नाहीत. राज्यातील अनेक जिल्हे तहानलेलेच आहेत.

14 जिल्ह्यात सरसरीपेक्षा कमी पाऊस

राज्यातील ठाणे, पालघर, मुंबई शहर,मुंबई उपनगर,रायगड,रत्नागिरी,कोल्हापूर,धाराशिव,छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. काही भागांत पूर आल्याचे पहायला मिळाले. नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामानाने कोकणात अधिक पाऊस होतो, तिथे मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

राज्यात 1 जूनपासून 18 जूनपर्यंत झालेला पाऊस

जिल्हा सरासरी पडलेला पाऊस

पुणे  122.6 92.9सोलापूर 184.6 68.7अहमदनगर 103.3 66.9धाराशिव 321.5 432.7लातूर  199.5 432.7बीड  138.8 75.8छ. संभाजीनगर 269.5 445.6नाशिक 86.4 83.6धुळे  61.9 63.9नंदूरबार 10.2 68.5नांदेड  54.9 73.8 परभणी 134.2 75.1जालना 122.3 71.7जळगाव  99.2 56.8बुडढाणा 105.5 69.1हिंगोली 13.9 88.1अकोला 84.1 76.1वाशिम 121.1 85.5अमरावती 57.4 73.1यवतमाळ 65.5 81वर्धा  49.5 73.7चंद्रपूर 32.9 77.5गडचिरोली 35  101.3नागपूर 40  68.7भंडारा 14.8 74.6गोंदिया 16.6 77.7पालघर 114.1 162.6ठाणे  112.3 184.8मुंबई शहर 146.3 268.6रायगड 184.7 275.4रत्नागिरी 280.2 398.9कोल्हापूर 100  171.8सिंधुदुर्ग 386.1 461.1सांगली 123  77.2सातारा 113.2 100.7

काही भागांत अधिक पाऊस

मराठवाड्यातील बीड, लातूर, परभणी, जालना या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. काही भागांत पूर आल्याचे पहायला मिळाले. नदी-नाले दुथडी भरून वाहत होते. त्यामानाने कोकणात अधिक पाऊस होतो, तिथे मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.