WATCH | धुळ्यात बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रेलरची पिकअपला धडक, 1 ठार, भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
धुळे जिल्ह्यातील साक्री शहरातील सुरत-नागपूर महामार्गावर धुळे कडून साक्रीकडे येत असलेली बस प्रवासी उतरवण्यासाठी थांबली होती. याचवेळी धुळ्याकडून साक्रीकडे भरधाव वेगात असलेल्या ट्रेलर थांबलेल्या एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात साक्रीकडून धुळ्याकडे जाणाऱ्या मालवाहू पिकअप जीप वर धडकला.
हा भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला आहे. यावेळी अपघातस्थळी महामार्गाच्या बाजूला बसची वाट पाहत थांबलेला एक प्रवाशी बालंबाल बचावला आहे. या अपघातामुळे सुरत -नागपूर महामार्गावरची वाहतूक साक्री शहराजवळ ठप्प झाली होती.