Dhule : उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) एमआयएम (MIM)  पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. धुळे शहराचे माजी आमदार डॉ फारुख शाह (Dr Farooq Shah) यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत (NCP जाहीर प्रवेश केला आहे. 2024 च्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) डॉ फारुख शाह यांनी 80 हजाराहून अधिक मते घेतली होती. धुळे शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीत केला प्रवेश केल्याची माहिती फारुक शाह यांनी दिली. 

Continues below advertisement

तिरंगी लढतीत फारूक शाह यांचा पराभव, भाजपचे अनुप अग्रवाल विजयी

डॉ फारुख शाह यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार  (Ajit Pawar)  यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश  केला आहे. प्रवेशावेळी मंत्री हसन मुश्रीफ आणि सुरज चव्हाण देखील होते उपस्थित होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात (Dhule City Assembly Constituency) यंदाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची ठरली होती. महाविकास आघाडीकडून (mahavikas Aghadi) शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांना रिंगणात उतरवले होते. तर त्यांच्याविरोधात महायुतीतून (Mahayuti) भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल (Anup Agrawal) यांचे आव्हान होते. तसेच एमआयएमचे विद्यमान आमदार फारूक शाह (Faruk Shah) हे निवडणुकीच्या आखाड्यात असल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. मात्र भाजपचे उमेदवार अनुप अग्रवाल यांचा दणदणीत विजय झाला.

2019 च्या निवडणुकीत फारुक शहा हे 46 हजार 679 मते मिळवत विजयी झाले होते

धुळे शहर विधानसभा मतदारसंघात 2009 साली लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून अनिल गोटे हे 59 हजार 576 मतांनी विजयी झाले होते. तर 2014 साली अनिल गोटे यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत तब्बल 57 हजार 780 मते मिळवत विजय प्राप्त केला होता. तर 2019 च्या निवडणुकीत अनिल गोटे यांना तसेच सर्व हिंदू उमेदवारांना पराभवाची धूळ चाखत एमआयएमचे आमदार फारुक शहा हे 46 हजार 679 मते मिळवत विजयी झाले होते. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून प्रथमच मुस्लिम धर्मीय उमेदवार विजयी झाल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. 60 ते 70 टक्के हिंदू बहुल असलेला धुळे शहर विधानसभा मतदारसंघ एमआयएमच्या ताब्यात गेल्याने 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षातील हिंदू उमेदवारांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी असदुद्दीन ओवेसींची MIM नव्या भिडूच्या शोधात, वंचितशी बिघडल्यानंतर उत्तर प्रदेशातील 'या' पक्षासोबत बोलणी